Mumbai Police मुंबई: नाताळ सण आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस (Mumbai Police) ॲक्शन मोडमध्ये आहेत. मुंबई पोलिसांकडून मध्यरात्री मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली.
अंधेरी पूर्वेत एमआयडीसी पोलिसांकडून साठे चौकात मध्य रात्री नाकाबंदी लावण्यात आली. या नाकाबंदी दरम्यान रस्त्यावरून जाणारे प्रत्येक वाहनांची तपासणी एमआयडीसी पोलिसांचा अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून करण्यात आली. या नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचा पालन न करणारे वाहन चालक सोबत मध्य रात्री फिरणारे सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
मुंबई विमानतळाबाहेर परदेशी नागरिकांच्या सर्रासपणे फसवणूक आणि लूट-
मुंबई विमानतळाबाहेर परदेशी नागरिकांच्या सर्रासपणे फसवणूक आणि लूट सुरु असल्याचे दिसून आले. रिक्षा टॅक्सी कॅब आणि डॉलरचा रुपयांमध्ये बदलून देणारे एजंटकडून परदेशी नागरिकांची लूट सुरू आहे. मुंबई विमानतळावर लूट करणारे रिक्षा टॅक्सी कॅब विरोधात मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
रिक्षा, टॅक्सी कॅब विरोधात कारवाईला सुरुवात-
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मागील 3 दिवसात लूट (टाउटिंग) करणारे रिक्षा व टॅक्सी कॅब चालकांचा शोध घेऊन सहार पोलीस ठाणे येथे कलम 207 मो वा का अन्वये 13 वाहनांवार कारवाई करण्यात आली आहे. मुंबई विमानतळात मोठ्या संख्यामध्ये परदेशी नागरिकांचे फसवणूक (टाउटिंग) होत असल्याचं सहार पोलीस स्टेशन आणि विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने सहार पोलिसांनी मुंबई विमानतळ परिसरात विदेशी नागरिकांच्या फसवणूक आणि लूट(टाउटिंग) करणारे रिक्षा, टॅक्सी कॅब विरोधात कारवाईला सुरुवात केली आहे.
नाताळ सण निमित्ताने मुंबई सज्ज-
नाताळ सण निमित्ताने मुंबई सज्ज झाली असून आज मध्यरात्री ख्रिसमससाठी ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा करण्यात येणार आहे. मुंबईत सुप्रसिद्ध वांद्रे इथला माऊंट मेरी चर्च मध्ये देखील रात्री बारा वाजता विशेष प्रार्थना केली जाणार आहे.वांद्रे मध्ये मोठा संख्या मध्ये ख्रिस्ती बांधवांची माऊंट मेरी चर्च परिसरात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरांमधून येऊन मोठी गर्दी केली होती. वांद्रे इथला माउंट मेरी चर्च मध्ये विद्युत रोषणाई सह सुंदर देखावे साकारण्यात आले आहे.संपूर्ण माउंट मेरी परिसरात नाताळ सण निमित्ताने मोठी लाइटिंग करण्यात आली आहे.गर्दी पाहता माऊंट मेरी चर्च परिसरात मध्यरात्री पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता...