एक्स्प्लोर
मला शेतीतज्ज्ञ व्हायचंय, बीएमसी शाळेतील मुलांची इच्छा
बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या दहावीत शिकणाऱ्या सर्वाधिक विद्यार्थ्यांना आयटी किंवा वैद्यकीय क्षेत्रात नव्हे तर शेती क्षेत्रात शिक्षण घेऊन त्यातच करियर करायचं आहे.
मुंबई: सध्याच्या काळात मला शेतकरी व्हायचंय किंवा शेतीक्षेत्रात करिअर घडवायचं आहे असं म्हणणारे विद्यार्थी विरळच आहेत. मात्र, बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सध्या दहावीत शिकणाऱ्या सर्वाधिक विद्यार्थ्यांना आयटी किंवा वैद्यकीय क्षेत्रात नव्हे तर शेती क्षेत्रात शिक्षण घेऊन त्यातच करियर करायचं आहे.
9.46 टक्के विद्यार्थ्यांना शेतीमध्ये रस आहे आणि त्यांना 'शेतीतज्ज्ञ' व्हायचे आहे. तर 7.30 टक्के विद्यार्थ्यांना देश रक्षणासाठी सैन्यात जायचं आहे.
7.25 टक्के विद्यार्थ्यांना पोलीस दलात भरती होऊन देश आणि समाजसेवा करण्याची इच्छा आहे.
दहावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे? या अनुषंगाने मनपा शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमादरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
चाचणीनुसार आवडीचे क्षेत्र - टक्केवारी
शेतीतज्ज्ञ (Agriculturist)- 9.46
सशस्त्र सेना (Armed Forces) - 7.30
पोलीस सर्व्हिस (Police Service) - 7.25
पॅरामेडिकल (Paramedical)- 6.99
लेखाकर्म (Accountant) - 4.11
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement