एक्स्प्लोर

Narayan Rane Adhish Bungalow : नारायण राणेंच्या बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार का?, BMC ची दुसरी नोटीस

Narayan Rane Adhish Bungalow : पुढील 15 दिवसांत स्वत:हून अतिरीक्त अनधिकृत बांधकाम निष्कासीत करा नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल, असे पालिकेकडून या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. 

Narayan Rane Adhish Bungalow : मुंबई महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे. महापालिकेच्या के वेस्ट विभागाकडून नारायण राणेंच्या आधिश बंगल्याला पुन्हा नोटीस पाठवण्यात आली आहे. पुढील 15 दिवसांत स्वत:हून अतिरीक्त अनधिकृत बांधकाम निष्कासीत करा नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल, असे पालिकेकडून या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.  मात्र, पहिल्या नोटीसीनंतर दुस-या नोटीसीतही 15 दिवसांचेच अल्टीमेटम दिल्यानं पालिकेच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष दौंडकर महापालिका आयुक्तांना राणे बंगला कारवाईप्रकरणी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. नारायण राणेंच्या बंगल्याला वरवरच्या कारवाईची नोटीस काढून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरटीआय कार्यकर्त्याचा आरोप आहे. दरम्यान, जुहूतील नारायण राणेंच्या बंगल्यातील बांधकाम हे अनधिकृत असल्याचा ठपका मुंबई पालिकेकडून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अधीश बंगला पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता. काय आहे नेमका केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याचा वाद?

काय आहे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याचा वाद?

  • जुहूतील अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याचे नमूद करत 351(1)ची नोटीस दिली आहे.
  •  बंगल्यात केलेले बदल मंजूर केलेल्या प्लॅननुसार असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले होते. यानुसार राणे यांनी सर्व कागदपत्रे पालिकेला दाखवली. परंतु पालिकेचे समाधान न झाल्याने दुसरी नोटीस पाठवण्यात आलीय.
  • 21 फेब्रुवारी पालिकेच्या के पश्चिम विभागाने बंगल्यात जाऊन तपासणी  केली होती
  • सर्वच मजल्यांवर चेंज ऑफ यूझ झाले असून बहुतांश ठिकाणी गार्डनच्या जागी रूम बांधल्याचा नोटीसीत उल्लेख आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई मनपाला केली होती. मात्र, आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली. मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार बीएमसीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली.

काय आहेत आरोप?

  • सीआरझेड क्लिअरन्सअंतर्गत चार मजल्यांची बिल्डिंग उभारण्याची परवानगी मात्र प्रत्यक्षात आठ मजले बांधले
  • परवानगीपेक्षा अधिक एफएसआयचा वापर करण्यात आला
  • सीआरझेड-यू क्षेत्रात बेसमेंट बेकायदेशीरपणे बांधले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन
  • पालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल अधिकाऱ्यांनी फ्रॉड केलाय
  • वरील मजल्यांच्या आत असलेले आणि ओपन स्काय नसलेले आणि वरील मजल्यावर मोठे टेरेस गार्डन म्हणून दाखवले गेले आणि एफएसआय मोफत दिला गेला. यात देखील नियमांचे उल्लंघन
  • जुन्या मंजूर केलेल्या लेआऊटचे उल्लंघन केल्यावर नवीन लेआऊट तयार करणे आवश्यक होते मात्र तसा कोणताही नवा लेआउट तयार केला नाही

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Dominos Pizza Action : मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई
मुंबईकरांच्या जिवाशी खेळ! खराब अन्न, जळालेले तेल अन् अस्वच्छ फ्रिज; डॉमिनोज पिझ्झाच्या 3 शाखांवर FDA ची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Rajendra Shinde and Pradeep Purnekar: अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले,
अखेर कनेक्शन समोर आलंच, राजेंद्र शिंदे पोलिसांना म्हणाले, "होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना ओळखतो"
IND vs WI 4th T20 : वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
वारंवार तीच घोडचूक, चौथ्या टी-20 मध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव! टीम इंडियाला बुडवणारे 5 खेळाडू, कोण आहेत ते?
Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Embed widget