एक्स्प्लोर
Advertisement
भाजपची साथ सोडणार, आणखी एक अपक्ष शिवसेनेत?
मुंबई: मुंबई महापालिका निकालानंतर शिवसेनेचं संख्याबळ दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कारण आधीच चार अपक्षांनी साथ दिली असताना, आता भाजपची साथ सोडून पाचवा अपक्षही सेनेच्या ताफ्यात दाखल होण्याची चिन्हं आहेत.
त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 84 +4+1 = 89 इतकं होणार आहे.
वांद्रे येथील वॉर्ड 102 च्या नगरसेविका मुमताज खान या शिवसेनेच्या गोटात दाखल होणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. मात्र मुमताज यांच्याकडून अद्याप त्याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही.
मुमताज खान यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा दावा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी निकालाच्या दिवशीच केला होता.
मात्र आता मुमताज खान यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
याशिवाय अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळीही शिवसेनेला साथ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 90 पर्यंत पोहोचण्याची चिन्हं आहेत. यापूर्वी शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष- गोरेगावच्या दिंडोशीतील (प्रभाग क्रमांक 41) अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे
- प्रभाग क्रमांक 160 मधील किरण लांडगे
- अंधेरी (पश्चिम) मधील प्रभाग क्रमांक 62 मधील चंगेज मुलतानी
- घाटकोपरमधील वॉर्ड 123- स्नेहल मोरे
- मुंबईत शिवसेनेची आणखी एक जागा वाढणार!
मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात
मुंबईत शिवसेनेची आणखी एक जागा वाढणार!शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
पक्षनिहाय निकाल : 10 महापालिकांमध्ये कुठे कुणाला बहुमत?
BMC election result : मुंबई विजयी उमेदवारांची यादी
जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!
मुंबईत कुणाचा महापौर बसणार? सत्तेची समीकरणं
मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
भारत
निवडणूक
Advertisement