BMC Scam Allegation by BJP : मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपनं स्थायी समितीत केला आहे. मुंबईकरांचा त्रास दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या किटक नाशक विभागाच्या माध्यमातून उंदरांचा नायनाट करण्यात येतो. उंदिर मारण्याबाबतचा 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. त्यात ए ते टी विभागात म्हणजेच मुंबई शहर आणि पूर्व उपनगरात 1 कोटी रुपये खर्च करून उंदिर मारण्यात आल्याचे म्हटले आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. 


प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे की, एक उंदिर मारण्यासाठी 20 रुपये तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदिर मारल्यास प्रत्येक उंदिर मारण्यास 22 रुपये या दराने उंदिर मारण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद केले आहे. पालिकेने केवळ 5 वॉर्डमध्ये 1 कोटी रुपये खर्च करून उंदीर मारले आहेत. मात्र किती उंदिर मारले याचा आकडा पालिकेने दिलेला नाही, प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे. 


उंदरांच्या उत्पतीची कारणे कोणती ती सुद्धा प्रस्तावात दिलेली नाहीत. यामुळे नक्कीच उंदिर मारले गेले का यावर शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. 


प्रभाकर शिंदे यांनी म्हटलं आहे की, याविषयी सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश करण्याचे  स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. तसेच पुढील बैठकीत माहिती येईपर्यंत प्रस्ताव राखून ठेवला. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 






संबंधित बातम्या :