IPL 2022 Auction: आयपीएल 2022 (IPl 2022) या बहुप्रतिक्षीत स्पर्धेसाठी अवघं क्रिकेट जगत सज्ज झालं आहे. सामन्यांना काही महिने शिल्लक असले तरी आता महालिलावामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. यंदा आयपीएलमध्ये आठ जागी 10 संघ खेळणार आहेत. नव्या आलेल्या संघासह जुन्या संघानी आपआपले तीन ते चार खेळाडू रिटेन केले असून आता इतर संघ पूर्ण करण्यासाठी महालिलाव पार पडणार आहे. येत्या 12- 13 फेब्रुवारीदरम्यान आयपीएलचा हा मेगा ऑक्शनचा कार्यक्रम पार पडणार आहे. यंदा अनेक परदेशी खेळाडूंच्या खिशात तगडी रक्कम पडणार आहे. कारण सर्वच संघ टॉपचे खेळाडू टीममध्ये घेण्यासाठी उत्सुक असतील. यामध्ये नेमकं कोणत्या पाच परदेशी खेळाडूंवर संघाचं लक्ष असेल यावर एक नजर फिरवूया...
- डेव्हिड वॉर्नर - हैद्राबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा फॉर्म मागील आयपीएलमध्ये काहीसा खराब झाला. ज्यामुळे त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं शिवाय संघातही त्याला स्थानही मिळालं नाही. पण मागील काही महिन्यात त्याने दाखवलेल्या दमदार खेळीमुळे आता महालिलावात त्याच्यावर तगडी बोली लागणार हे नक्की.
- कागिसो रबाडा - दिल्ली संघाने दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्खिया याला रिटेन केलं. पण दुसरा क्लासिक खेळाडू रबाडा याला मात्र ते रिटेन करु शकले नाहीत. आता त्याला घेण्यासाठी दिल्ली प्रयत्न करेल, पण इतरही संघ त्याला घेण्यासाठी उत्सुक असणार.
- जेसन होल्डर - अष्टपैलू खेळाडूंना कायमच मागणी असते. त्यात वेस्ट इंडिजचा अष्टपैलू म्हणजे वेगळीच गोष्ट. रस्सेल, पोलार्ड यांच्याप्रमाणे धांसू खेळाडू जेसन होल्डरवर उद्या मोठी बोली लागू शकते.
- ट्रेन्ट बोल्ट - मुंबईचा महत्त्वाचा खेळाडू ट्रेन्ट बोल्टला संघाने रिटेन केलेलं नाही. पण त्याला संघात घेण्यासाठी मुंबईसह इतरही संघ मोठी रक्कम मोजू शकतात.
- लॉकी फर्ग्यूसन - न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसनला केकेआरने रिटेन केलेलं नाही. पण त्याची भेदक गोलंदाजी पाहता त्याला कोणताही संघ सामिल करण्यासाठी उत्सुक असणार हे नक्की.
हे देखील वाचा-
- IPL auction 2022 : हर्षल पटेल ते मोहम्मद शमी, 'या' वेगवान भारतीय गोलंदाजांना करारबद्ध करण्यासाठी संघ उत्सुक
- IPL auction 2022 : आयपीएल लिलावात 'या' 8 भारतीय फलंदाजांवर असेल सर्वांची नजर
- IND vs WI: भारताची ऐतिहासिक कामगिरी, सलग 11 एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला चाखली धूळ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha