एक्स्प्लोर

महापौरपदासाठी काँग्रेसचाही उमेदवार, राष्ट्रवादी म्हणते..

मुंबई: मुंबईत काँग्रेस शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार आहे. यासाठी राष्ट्रवादीशी काँग्रेसची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र काँग्रेसचा महापौरपदाचा उमेदवार निवडून येणार नाही तर आमचं संख्याबळ का वाया घालवायचं असा सवाल राष्ट्रवादीनं केला आहे. महापालिकेत काँग्रेसनं उमेदवार दिला तर बहुमतासाठीचं संख्याबळ कमी होईल आणि त्याचा शिवसेनाला फायदा होण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी 114 हा आकडा गाठण्याची गरज नाही, तर महापौर निवडणुकीवेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सभासद संख्येपैकी, सर्वाधिक मतं ज्या उमेदवाराला मिळेल, तो महापौर होईल. पक्षीय बलाबल मुंबईत मनपा निवडणुकीत शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7, समाजवादी पक्षाला 6, MIM 2 आणि अपक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत.

महापौर निवडणूक नेमकी कशी होते?

कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने, सध्या शिवसेना-भाजप या प्रमुख विरोधी पक्षात चुरस पाहायला मिळत आहे. 6 पैकी 4 अपक्षांनी शिवसेनेला, एकाने भापला पाठिंबा दिला आहे. तर अभासेच्या गीता गवळीही भाजपच्या बाजूने आहेत. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 88 आणि भाजपचं 84 झालं आहे. गीता गवळींना भाजपचं आश्वासन अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि डॉन अरुण गवळीची मुलगी गीता गवळी या अखेर भाजपच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. भाजपने गीता गवळी यांना स्थायी समितीचं सदस्यपद आणि आरोग्य विभागाचं चेअरमनपद देण्याचं आश्वासन दिलं आहे. गीता गवळी या थोड्या वेळापूर्वी भाजप कार्यालयात दाखल झाल्या. याशिवाय वॉर्ड 102 मधील अपक्ष नगरसेविका मुमताज रहेबर राजा खान यांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 84 झालं आहे. भाजप आज या 84 जणांच्या गटाची नोंदणी विभागीय कोकण आयुक्तांकडे करणार आहे. मनोज कोटक गटनेतेपदी दरम्यान भाजपने पुन्हा एकदा मनोज कोटक यांची गटनेतेपदी निवड केली आहे. कोटक हे यंदा तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मनोज कोटक हे गुजराती असले तरी मराठीवर त्यांचं प्रभुत्व आहे. याशिवाय ते स्थायी समिती सदस्य आहेत. यापूर्वी कोटक यांनी सुधार समितीचं सदस्यपद सांभाळलं होतं. महापालिकेच्या विविध समित्यांमध्ये काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. कोटक यांचा पालिकेतील कामकाजाच्या तांत्रिक बाजूंचा चांगला अभ्यास आहे. ते मुलुंडमधून निवडून आले आहेत.  गीता गवळी 'वर्षा'वर अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि डॉन अरुण गवळीची मुलगी गीता गवळी मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा देणार आहेत. गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेतली. गीता गवळी आज कोकण भवनात जाऊन गटनोंदणी करणार आहेत. त्यामुळे गीता गवळी यांना आपल्या बाजूने वळवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलं आहे. महापौर निवडणूक आणि आकड्यांचं गणित याआधी गीता गवळी या शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं सांगण्यात येत होतं. त्यांनी गुरुवारी शिवसेना भवनातही हजेरी लावली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे शिवसेना भवनात गीता गवळी आणि एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्यातील बोलणी फिसकटली. त्यामुळे गीता गवळी निर्णय न घेताच सेनाभवनातून परतल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गीता गवळी यांना चर्चेसाठी काल ‘वर्षा’ बंगल्यावर बोलवलं होतं. गीता गवळींना स्थायी समितीचं सदस्यपद आणि आरोग्य विभागाचं चेअरमनपद देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. या मागण्या मान्य केल्याने गीता गवळी आता महापौरपदासाठी भाजपला पाठिंबा देणार आहेत. गीता गवळी यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी थेट अरुण गवळी यांच्याकडून मध्यस्थीचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात होतं. संबंधित बातम्या महापौर निवडणूक आणि आकड्यांचं गणित गीता गवळींना वळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची अरुण गवळींकडे सेटिंग? ...म्हणून उद्धव ठाकरे दानवेंच्या मुलाच्या लग्नाला जाणार नाहीत! BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ मुख्यमंत्री दिल्ली दरबारी, शिवसेनेसोबतच्या कोंडीवर चर्चा? शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ दगाफटक्याची चिंता नाही, महापौर शिवसेनेचाच : अनिल परब शिवसेना-भाजप युतीसाठी मी पुढाकार घेईन: आठवले युती होणार का? आशिष शेलार म्हणतात… राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला? तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87 युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget