एक्स्प्लोर
Advertisement
राज्य सरकारची थकबाकी लवकर द्या, मुंबईच्या महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : राज्य सरकारची 3523 कोटींची थकबाकी मुंबई महापालिकेला लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या थकबाकीमुळे महापालिकेला नागरी प्रकल्पांना मूर्त स्वरुप देण्यात अडचणी येत असल्याचं महापौरांनी पत्राद्वारे म्हणलं आहे.
राज्य सरकारकडून महापालिकेला मिळणारे अनुदान आणि विविध शासकीय कार्यालयांकडून भरला जाणार कर अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा निधी रखडल्यामुळे अनेक नागरी प्रकल्पांना मूर्त स्वरूप देणे अडचणीचे होत आहे. थकबाकीची रक्कम आता कोटीच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे ही रक्कम लवकरात लवकर मिळावी अशी मागणी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
राज्य सरकारकडून अपेक्षित असलेली देय रक्कम गेली अनेक वर्षे प्रलंबित असल्यामुळे पालिकेला मुंबईकरांसाठी राबवायच्या नागरी प्रकल्पांना मूर्त स्वरूप देणं शक्य होत नाही, असे महापौरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement