मुंबई :  निवडणुकांआधी शिवसेना भाजपमध्ये घमासान सुरु झालं आहे. बाळासाहेब ठाकरेच्या जयंती निमित्तानं उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणानं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणलं. मुंबई आणि महाराष्ट्रासह दिल्ली काबिज करण्याचं स्वप्न उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दाखवलं. भाजपबद्दलचा राग उद्धव ठाकरेच्या प्रत्येक वाक्यात दिसत होता. त्यामुळे नव्या सेनापतीनं नवी रणनीती आखलीय आणि भाजपवर न बोलता थेट आपल्या कामानं उत्तर देण्याचा चंग आदित्य ठाकरेंनी धरला आहे. 


 वडिलाचं आजारपण, मुख्यमंत्री पदाची जबाबदारी लक्षात घेता आदित्य ठाकरेंनी मुंबईची धुरा आपल्या ताब्यात घेतलीय. टीम युवा यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचं नेतृत्त्व करणार आहेत. त्यासाठी नवा गडी, जुन्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीत उतरणार आहे. 



  • मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली प्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांवर शिवसेनेची नजर आहे.

  • सध्या शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकांवर जास्त लक्ष केंद्रीत केलंय

  • राज्यातल्या इतर निवडणुकांसाठी मुंबई पॅटर्न राबवला जाणार आहे

  • आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विभागवार बैठका होणार 

  • दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर,उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई या विभागवार बैठका होतील

  •  नगरसेवक, शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख यांच्याशी थेट संवाद 

  • 18 ते 30  वयोगटातल्या युवा सैनिकांना घरोघरी जाण्याचे आदेश 

  • शाखेतल्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या नेतृत्वाखाली युवासेना काम करणार 

  • नगरसेवक, आमदार आणि खासदरांची रखडलेली काम पुर्ण करणे आणि नविन उपक्रम राबविण्यावर भर 

  • मुंबईतल्या एकूण 236 जागांवर तयारी करण्याचं धोरण 

  • तसेच ओबीसी वॅार्ड झाला तर काय? किंवा बिगरओबीसी वॅार्ड असेल तर काय करायचं याची आतापासूनच रणनीती आखली जाणार 


आदित्य ठाकरे विविध विकासकामांनी मुंबईचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या उमेदवारांची समीकरणंही बदलणार आहेत विभागवार बैठकीतच नगरसेवकांचं एकप्रकारे प्रगती पुस्तकच तपासलं जाणार आहेत. त्यामुळे वशिलेबाजी, आमदारांचा मुलगा किंवा नेत्यांच्या मुलांच्या सेटिंग यंदा चालणार नसल्याचं बोललं जातंय 


शिवसेनेच्या सेनापतींनी आदेश सोडले आहेत. सैन्य निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत रणनीती आखली जात आहे.  या रणनीती शिवसेनेचा मुंबई पॅटर्न यशस्वी झाला तर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्राभर हा पॅटर्न वापरला जाणार आहे.  त्यामुळे शिवसेनेचा हा नवा पॅटर्न काय कमाल करतोय हे निवडणुकीतच कळेल.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


मुंबई महापालिकेची वाढवलेली प्रभाग संख्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारीत


Aaditya Thackeray : नववर्षात आदित्यपर्व! आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचं धनुष्य आदित्य ठाकरेंच्या खांद्यावर


आज बाळासाहेब असते तर विरोधी पक्षांमधील कावकाव, चिवचिव थंड पडली असती : संजय राऊत 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha