एक्स्प्लोर

पालिका प्रशासन मान्सूनसाठी सज्ज, बीएमसीचा हायकोर्टात दावा

मुंबईतील मॅनहोल्सना संरक्षक जाळी बसवण्यासंदर्भात व्यापारी संघटनेने केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पालिकेने मान्सूनसाठी सज्ज असल्याचा दावा केला.

मुंबई : महापालिका प्रशासन मान्सूनसाठी सज्ज असल्याचा दावा बीएमसीने हायकोर्टात केला आहे. मुंबईतील मॅनहोल्सना संरक्षक जाळी बसवण्यासंदर्भात व्यापारी संघटनेने केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान पालिकेने हा दावा केला. कुलाबा ते सायन आणि चर्चगेट ते माहिम या भागात जिथे पावसाचं पाणी जमा होतं, त्या भागातील मॅनहोल्सवर लोखंडी संरक्षक जाळ्या बसवण्याचं काम पूर्ण झाल्याचंही बीएमसीने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. मुंबई शहर भागात 1425 ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवल्या आहेत, असं बीएमसीचं म्हणणं आहे. पावसाचं पाणी तुंबू नये यासाठी बीएमसीकडे वॉटर पंप आणि सहा पम्पिंग स्टेशन्स सज्ज असल्याची माहितीही पालिकेने कोर्टात दिली. दरम्यान, मुंबईच्या सहा समुद्रकिनाऱ्यांवर 36 जीवनरक्षक तैनात असल्याचंही पालिकेने कोर्टात सांगितलं. भरती दरम्यान साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळताना नागरिकांनी किनाऱ्याजवळ जाऊ नये, असं आवाहनही पालिकेनं केलं. 688 धोकादायक इमारतींना नोटीस जारी करण्यात आल्या आहेत, तर 299 ठिकाणी दरड कोसळ्याचा धोका असल्याच्या सूचना दिल्या आहेत, असंही पालिकेने सांगितलं. डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहितीही पालिकेने दिली. गेल्या वर्षी उघड्या मॅनहोलमध्ये पडून अमरापूरकरांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

Embed widget