एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 29 मार्चला !
मुंबई: आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई मनपाचा अर्थसंकल्प 29 मार्चला सादर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प 29 मार्चला स्थायी समिती बैठकीत सादर होईल.
स्थायी समितीत अर्थसंकल्पावर पुढील काही दिवस चर्चा झाल्यानंतर, मे महिन्यांत पालिका सभागृहात मांडला जाईल.
मागील वर्षी मुंबई महापालिकेचा 37 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा यात घट होण्याची शक्यता आहे.
शिवसेना यंदा पहिल्यांदा एकटी सत्तेत आहे, जाहिरनाम्यात शिवसेनेच्या अजेंड्यावरील किती बाबींची तरतूद केली जाणार हे पाहणे महत्वाचे आहे.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा छोट्या राज्यांपेक्षा मोठा असतो. गेल्यावर्षी तब्बल 37,052 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र यंदा त्यामध्ये 10 ते 11 हजार कोटींची कपात करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा 26 ते 28 हजार कोटींच्या दरम्यान असेल.
यंदा भांडवली खर्चाचे आकडे कमी करुन केवळ महसुली खर्चाचेच आकडे सादर करण्यात येतील. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात कपात केलेली पाहायला मिळेल.
महापालिकेचा एवढा मोठा अर्थसंकल्प असला, तरी स्थायी समितीला केवळ 40 टक्केच निधी विकासकामांवर खर्च आला. प्रत्येक वर्षी उर्वरित 60 टक्के निधी वाया गेला.
संबंधित बातम्या
शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची भाजपची तयारी: सूत्र
डॉक्टरांच्या संपामुळे 377 रुग्ण दगावले, वकिलांची हायकोर्टात माहिती
दिग्गजांना मागे सारुन मुंबई महापालिकेच्या स्वीकृत...
मुंबईत प्रभाग समितीच्या निवडीसाठी शिवसेना-मनसे युती
शिवसेनेच्या पाठिंब्याने गीता गवळींना प्रभाग समितीचं...
मुंबईतील 17 पैकी 8 प्रभाग समित्यांचा निकाल हाती, कुठे कोण...
मुंबई पालिकेत विरोधी पक्षनेता न देणं ही, सेना-भाजपची...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement