एक्स्प्लोर

एबीपी माझाच्या ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई : एबीपी माझाच्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीन आणि पाच उत्तेजनार्थ विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, डिजिटल महाराष्ट्र’ या कार्यक्रमात बक्षीस वितरण केलं जाईल. यंदा ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेसाठी जवळपास 150 ब्लॉगर्सच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून सर्वोत्कृष्ट 3 आणि उत्तेजनार्थ 5 विजेत्यांची निवड करणं अत्यंत कठीण काम होतं. कारण प्रत्येक ब्लॉग वेगळ्या विषयावरील आणि वेगळ्या धाटणीचा होता. मात्र, ब्लॉग माझा स्पर्धेच्या परीक्षक या नात्याने लेखिका कविता महाजन यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. फेसबुक, ट्विटरमुळे असं वाटलं होतं की, ब्लॉगिंग आणि त्यातही मराठी ब्लॉगिंगचं काय होणार? मात्र ही माध्यमं ब्लॉगिंगला पूरकच ठरत आहेत. मराठी ब्लॉगिंगचं क्षितिजही विस्तारत आहे. मराठी ब्लॉगर्स विविध विषयांना धीटपणे भिडत आहेत. अशाच मराठी ब्लॉगर्सचं कौतुक करण्याचं एबीपी माझाने ठरवलं आणि त्यातूनच ‘ब्लॉग माझा’ स्पर्धेची सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच ब्लॉग माझा स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. यंदाही महाराष्ट्रासह देश-विदेशातून ब्लॉगर्सच्या प्रवेशिका आल्या होत्या. यावरुनच या स्पर्धेची व्याप्ती दिसून येते. विजेते ब्लॉगर्स आणि ब्लॉगची लिंक :  
  • उत्तेजनार्थ 1 - अखिलेश दीपक परब (ब्लॉग लिंक - http://akhildeep.blogspot.in/ )
  • उत्तेजनार्थ 2 - प्रणव महाजन, विशाल खुळे, उमेश जोशी (ब्लॉग लिंक - http://raigad.wordpress.com )
  • उत्तेजनार्थ 3 - प्रशांत राजाराम परदेशी (ब्लॉग लिंक - http://prashantpardeshi.blogspot.in/ )
  • उत्तेजनार्थ 4 - नंदिनी देसाई (ब्लॉग लिंक - http://nandinidesai.blogspot.in/ )
  • उत्तेजनार्थ 5 - ज्ञानदेव पोळ (ब्लॉग लिंक - http://dnyandevpol.blogspot.in/ )
  परीक्षक कविता महाजन यांचं निरीक्षण : ब्लॉगचा विषय, आशय, भाषा, मांडणी आणि लेखनातील सातत्य  या पाच निकषांवर विचार करून ही निवड करण्यात आलेली आहे. समीर गायकवाड यांचा ब्लॉग स्वतंत्र विचार मांडणारा आणि सोबतच छायाचित्रांसह माहिती देणाराही आहे. त्यांनी अनेक विषयांवर सातत्यपूर्ण रीतीने लेखन केले आहे. वैभव छाया यांचे लेखन ठरावीक विषयांवर असले तरी सामाजिक भान, प्रामाणिक व निर्भीड मते त्यात आढळतात. मांडणीचाही विचार त्यांनी केलेला दिसतो. सतीश कुडतरकर यांचा ब्लॉग एका विषयाला वाहून घेतलेला असला तरी त्या विषयाच्या खोलात नेणारा आहे. भाषा आणि मांडणी या दोन्ही निकषांवर तो चांगला ठरतो. एकूण सर्व ब्लॉग पाहता त्यात विषयांचे वैविध्य खूपच कमी आढळले. राजकारण, क्रीडा, माहिती, खानपान, कला, संस्कृती, शिक्षण, धर्म, इतिहास  इत्यादी शेकडो विषयांमधल्या मोजक्याच विषयांना या लेखकांनी स्पर्श केलेला दिसतो आणि अनेक विषयांवरचे लेखन इथे अजिबातच आढळले नाही, ही मर्यादा जाणवली. मांडणीची समज देखील अजून विस्तारित व्हायला हवी, असे म्हणता येईल. सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा! एबीपी माझाकडून सर्व विजेत्या ब्लॉगर्सचं अभिनंदन !!!

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्जमुक्तीवरुन रविंद्र चव्हाणांचं वक्तव्य  
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमकी काय झाली चर्चा? शरद पवारांचा पक्ष खरचं NDA मध्ये सामील होणार का?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आज जयंत पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला, नंदनवन निवासस्थानी मोठी खलबतं 

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget