Black Fungus Symptoms : भारताओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचे रुग्ण वाढत असताना आता पुन्हा काळी बुरशी (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) चा धोका सतावत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांमध्ये काळ्या बुरशीची लक्षणे दिसली, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. हा आजार शरीरातील नाक, सायनस आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो. म्यूकरमायकोसिस या काळ्या बुरशीमुळे अंधत्व, अवयव निकामी होणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी, वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे. अलिकडेच मुंबईत काळ्या बुरशीचे पहिले प्रकरण समोर आले आहे.


5 जानेवारीला एका 70 वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे 12 जानेवारी रोजी महिलेमध्ये काळ्या बुरशीची लक्षणे दिसली. यादरम्यान रुग्णाची शुगर लेव्हल 532 च्या वर गेली होती. महिलेला तात्काळ डायबेटिक केटोअ‍ॅसिडोसिस उपचारावर ठेवण्यात आले आहे.


'ही' लक्षणे आहेत
म्यूकरमायकोसिसच्या लक्षणांमध्ये वाहणारे नाक, गालाच्या हाडात वेदना, चेहऱ्याच्या एका भागात वेदना, बधीरपणा किंवा सूज ही लक्षणे आढळतात. याशिवाय, वेदनांसोबत अंधुक किंवा दुहेरी दृष्टीची समस्या देखील जाणवते.


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना म्यूकरमायकोसिस या आजाराचा सामना करावा लागला होता. ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेल्या आणि दीर्घकालीन स्टिरॉईड्स असलेल्या रुग्णांमध्ये त्याची लक्षणे अधिक दिसून आली. याशिवाय, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी याचा अधिक धोका होता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha