BMC Mumbai Mahapalika New Ward : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 साठी बीएमसीने पाठवलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक मंजुरी दिल्यानंतर आता नवीन वॉर्ड पुनर्रचना प्रारूप अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असणार आहेत. या संदर्भातील प्रारुप आराखडा बीएमसीकडून जारी करण्यात आला आहे. आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे.
वॉर्डच्या नवीन सीमा केल्या जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीची नवीन वॉर्ड पुनर्रचना प्रारूप अधिसूचना जाहीर केली आहे. आता 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार आहेत. वॉर्डच्या नवीन सीमा केल्या जाहीर केल्या आहेत. नवीन सीमांचा मॅप जाहीर केला आहे. आता यावर हरकती सूचना नोंदविल्या जाणार आहे.
नव्याने वाढणाऱ्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग शहर भागात, तीन पश्चिम उपनगरात व तीन पूर्व उपनगरात वाढले आहेत. शहर भागातील तीन प्रभाग हे वरळी, परळ व भायखळामध्ये, पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसरमध्ये, पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर, गोवंडीत नवे प्रभाग आहेत. हे सर्वच 9 नवे प्रभाग हे शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात, त्यामुळे वॉर्ड पुर्नरचनेवर भाजपकडून आक्षेप नोंदवला जाण्याची शक्यता आहे.
या प्रारूप आराखड्यानुसार मुंबईत महापालिकेत एकूण 236 वॉर्ड असतील
आरक्षण
खुला प्रवर्ग - 219
एससी -15
एसटी - 2
महिला जागा
एकूण
खुला प्रवर्ग - 118
एससी - 8
एसटी - 1
महत्त्वाच्या बातम्या:
- BMC Budget 2022 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर होणार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात वाढ होण्याची शक्यता
- मुंबईसह राज्यातील कोरोना परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडून हायकोर्टात आश्वासन