Corona Virus : कोरोना व्हायरसने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनचा (Omicron) कहरही सुरू झाला आहे. विषाणूची लागण टाळण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. त्याच वेळी, बहुतेक लोक त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या काळात तुम्ही अशा काही पदार्थांचे सेवन करत असाल, ज्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरली जाणारी प्रतिकारशक्ती कमकुवत होईल, तर वेळीच सावध व्हा. रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होण्यापासून वाचवण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये, हे जाणून घेऊया....


व्हाईट ब्रेड


अजूनही बहुतेक घरांमध्ये ब्रेड आणि बटर नाश्ता म्हणून दिला जातो. मात्र, रोज खाल्ला जाणार व्हाईट ब्रेड रोगप्रतिकार शक्ती कमकुवत करतो. यासोबतच ब्रेडचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचते. व्हाईट ब्रेडचे सेवन केल्याने तुम्ही लठ्ठपणाचे देखील शिकार होऊ शकता. म्हणूनच व्हाईट ब्रेडचे सेवन टाळले पाहिजे.


बीयर


अनेकांना बीयर आवडते, पण त्याने शरीराला खूप नुकसान होते. इतकेच नाही तर, त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती ही कमकुवत होते. त्यामुळे बीयर पिणे टाळा.


सोडायुक्त पेय  


सोड्याची चव फक्त मोठ्यांनाच आवडत नाही, तर लहान मुलांनाही खूप आवडते. पण, सोडा आणि सोडायुक्त पेये आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक आहेत. यामध्ये साखरेसोबतच रंगांचाही वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सोड्याचा वापर टाळावा.


जंक फूड


जंक फूड चवीला खूप छान वाटते. पण, जंक फूड खाल्ल्याने तुम्हाला अनेक आरोग्य समस्या येऊ शकतात, त्यामुळे जंक फूडचे सेवन अजिबात करू नये.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha