Cold And Cough Problem : बदलत्या ऋतूमध्ये तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा सर्दी-खोकला होण्याचा धोका जास्त असतो. तसेच, विषाणू संसर्ग, ऍलर्जी, सायनस यांसारखे आजार होण्याचीही शक्यता असते. सर्दी-खोकल्यासाठी अनेकजण डॉक्टरकडे जात नाहीत. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय (Home Remedies) करून तुम्ही सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला खोकला दूर करण्याचे पाच उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा कोरडा खोकला सहज निघून जाईल. तसेच थंडीतही आराम मिळेल. चला जाणून घेऊयात.  


1. मध


मध हे आयुर्वेदात फार गुणकारी मानले जाते. तुम्हाला जर कोरडा खोकला होत असेल तर मधाचे सेवन नक्की करा. मध खाल्ल्याने खोकल्यामध्ये आराम मिळतो. कोमट दुधात एक चमचा मध टाकून घेतल्यास खोकल्यामध्ये आराम मिळतो. 


2. तुळस


तुळशीची पाने खोकला आणि सर्दीमध्ये खूप फायदेशीर आहेत. तुळशीची पाने पाण्यात उकळून त्याचा डेकोक्शन बनवून प्या. याशिवाय तुळशीच्या पानांचा रस आले आणि मध मिसळूनही तुम्ही हे चाटण खाऊ शकता. 


3. आले


आले आणि मध खाल्ल्याने खोकल्याला लगेच आराम मिळतो. एक चमचा आल्याच्या रसात एक चमचा मध मिसळून चाटले तर शरीराला ते फारच फायदेशीर ठरते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आले घालूनही डेकोक्शन बनवू शकता. 


4. मीठ


खोकल्यावर कुस्करल्यानेही आराम मिळतो. सेंधव मीठ ज्याला रॉक सॉल्ट म्हणतात ते गरम पाण्यात टाकून सकाळी आणि संध्याकाळी गुळण्या करा. असे केल्कोयाने अगदी दोन दिवसांत तुम्हाला सकारात्मक फरक दिसेल.


5. कांदा


खोकल्यामध्ये कांद्याचा रस देखील फायदेशीर आहे. अर्धा चमचा कांद्याचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा. असे दिवसातून दोनदा केल्याने नक्की फरक पडतो. यामुळे तुमचा खोकलाही थांबेल. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha