Health Care Tips : देशभरात सध्या थंडीचे वातावरण आहे. पण या थंड हवेने नागरिकांना मात्र चांगलेच हैरान केले आहे. हिवाळ्यात वाहणारे थंड वारे अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकतात. वृद्धांनादेखील या थंड हवेचा प्रचंड त्रास होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, थंडीच्या लाटेमुळे मृतांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे स्वतःला सुरक्षित ठेवले पाहिजे.
थंडीत स्वतःला सुरक्षित ठेवणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे चहा, कॉफी असे गरम पदार्थ प्यावे. थंडीत चहा पिणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे शरीरातील तापमानदेखील वाढेल.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने थंडीपासून बचाव करण्यासाठी मद्यपान न करण्याचा सल्ला दिला आहे. अल्कोहोल शरीराचे तापमान कमी करते जे थंड हवामानात हानिकारक ठरू शकते. तसेच हिवाळ्यात उबदार कपडे घालावेत.
एनडीएमनुसार, हातमोजे ऐवजी मिटन्सचा वापर करता येऊ शकतो. हातमोजेपेक्षा मिटन्स गरम मानले जातात. त्यामुळे शरीर उष्ण राहायला मदत होते. अशाप्रकारे थंडीपासून स्वतःचे संरक्षण करावे. या व्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसांत आहारात काही खास खाद्यपदार्थांचादेखील समावेश करू शकता.
मध : कफसाठी घरगुती उपाय म्हणून मध सर्वोत्तम मानले जाते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स जंतूंशी लढण्यास मदत करतात. याशिवाय घशातील खवखव दूर करण्यासाठीही मध महत्त्वाचे आहे. हर्बल टी किंवा लिंबूपाण्यात दोन चमचे मध मिसळून दिवसातून दोनदा प्या.
हळद : गरम दुधात हळद मिसळून प्यायल्यास सर्दी आणि खोकल्याशी लढण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात हळद मिसळून प्या. सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha