एक्स्प्लोर
मुंबई मनपाच्या आखाड्यात भाजपचा अब्जाधीश उमेदवार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यात घाटकोपरच्या एन वॉर्डची निवडणूक ही धनाढ्य उमेदवारांची निवडणूक ठरत आहे. याचं कारण म्हणजे भाजपचे उमेदवार पराग शाह. व्यावसायिक असलेले पराग शाह हे प्रभाग क्रमांक 132 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पण, नगरसेवकपदासाठी उतरलेल्या शाह यांच्याकडे एखाद्या खासदार, आमदारालाही लाजवेल एवढी संपत्ती आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, पराग शाह यांच्याकडे 689 कोटी 95 लाख 2 हजार 327 रुपये एवढी प्रचंड संपत्ती आहे. विशेष म्हणजे त्यांच्यावर कोणत्याच बँकेचं कर्जही नाही. गुजराती मतदार बहुल या प्रभागात शिवसेनेने सुधाकर पाटील, तर काँग्रेसने प्रवीण छेडांनी उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर भाजपचे धनाढ्य उमेदवार पराग शहा यांनी तगडं आव्हानं उभं केलं आहे.
Before You Go
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले





















