एक्स्प्लोर
सोशल मीडियावर जोरदार टीका, भाजपची 'ती' जाहिरात मागे

मुंबई : प्रचारासाठी अवघे काही तास उरले असताना भाजपने मुंबई महापालिकेसाठी तयार केलेली, 'मुंबई आणि भाजप मेड फोर इच अदर' ही जाहिरातच मागे घेतली आहे. यंदा इतर राजकीय पक्षांपेक्षा भाजपच्या प्रचाराच्या जाहिराती टीव्हीवर जास्त झळकताना दिसत आहेत. मात्र त्या सर्व जाहिरांतीमध्ये कॉलेज तरुणांना घेऊन तयार केलेली 'भाजप आणि मुंबई मेड फोर इच अदर' या जाहिरातीची जास्त चर्चा आहे. सुमार दर्जामुळे या जाहिरातीवर सोशल मीडियामध्ये टीकेचा भडीमार सुरु झाला. नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी ही जाहीरात मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सोशल मीडिया सेललाही खडसवल्याची माहिती मिळते.
Before You Go
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट






















