एक्स्प्लोर

राणेंच्या प्रवेशावर अमित शाहांची संघ पदाधिकाऱ्यांशी चर्चा?

साधारण पाऊण तास सुरु असलेल्या या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू नारायण राणे हेच असल्याची माहिती आहे.

मुंबई : नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात खलबतं सुरु झाल्याची चर्चा आहे. मुंबई दौऱ्यावर असलेले भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दादरमधल्या संघ कार्यालयाला भेट दिली. संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह यांची सकाळी बैठक झाली. साधारण पाऊण तास सुरु असलेल्या या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू नारायण राणे हेच असल्याची माहिती आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाला अनेक भाजप नेत्यांनी विरोधी सूर आळवला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राणेंच्या संभाव्य पक्षप्रवेशाकडे कसं पाहतं, हेसुद्धा महत्त्वाचं आहे.

अमित शाहांसोबतची बैठक संपली, राणेंचा भाजप प्रवेश गुलदस्त्यातच

दरम्यान, नारायण राणेंचा भाजप प्रवेश दिवाळीनंतरच होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. राज्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर राणेंच्या पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला जाईल. दिवाळीपर्यंत भाजप 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याची माहिती आहे. सोमवारी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी नारायण राणे सकाळीच दिल्लीत दाखल झाले होते. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतल्या घरी राणे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी काही वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मात्र नंतर परिवहन खात्यातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी ते निघून गेले. या बैठकीनंतर नारायण राणे, चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे एकाच गाडीतून अमित शाह यांच्या घरी दाखल झाले. अमित शाह यांच्या घरी सर्व नेत्यांमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र अजून समोर आलेलं नाही. नारायण राणे हे सिंधुदुर्गातल्या हॉस्पीटलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी दिल्लीत आले होते. बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा अजब दावा बैठकीनंतर रावसाहेब दानवेंनी केला. मात्र एवढं जाहीरपणे दिल्लीत येणं, भाजप नेत्यांच्या गाडीत फिरणं, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि पक्षाध्यक्षाशी चर्चा करणं यांमुळे एकंदरीत राणेंसाठी भाजपचे दरवाजे उघडले आहेत, असं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget