एक्स्प्लोर

एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत, चंद्रकांत पाटलांना विश्वास

येत्या 2022 ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं हे भाजपचं उद्दीष्ट आहे. त्यामुळे मुंबईच्या बाबतीत लहान-लहान गोष्टींचा विचार आम्ही करत आहोत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजप सोडणार नाहीत, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजप पक्ष मोठा करण्यामध्ये एकनाथ खडसेंचा वाटा मोठा आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुंबईतील भाजपची संघटनात्मक बैठक संपल्यानंतर ते बोलत होते. याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात भाजपचं जे संघटन आज उभं राहिलं आहे, त्यामध्ये एकनाथ खडसेचं योगदान मोठं आहे. गेल्या तीस वर्षात कोणत्याही एका पक्षाला विधानसभा निवडणुकीत 100 हून अधिक जागा जिंकणे शक्य झालं नव्हतं, ते भाजपने करुन दाखवलं. यामध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह एकनाथ खडसेंचा मोठा वाटा आहे. एकनाथ खडसेंनी विरोधी पक्षात असताना अत्यंत प्रभावीपणे काम केलं. एकनाथ खडसे भाजपचे नेते आहेत. माणसं रागावतात त्यावेळी ते व्यक्त होतात. एकनाथ खडसे भाजप सोडण्याचा विचार करणार नाहीत, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

राज्यातील भाजपचं एकूण संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सध्या आम्ही मुंबईवर लक्ष केंद्रीत केलं आहे. येत्या 2022 ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकणं हे भाजपचं उद्दीष्ट आहे. त्यामुळे मुंबईच्या बाबतीत लहान-लहान गोष्टींचा विचार आम्ही करत आहोत. येत्या 15 डिसेंबरपर्यंत वॉर्ड अध्यक्ष, 20 डिसेंबरपर्यंत विधानसभा क्षेत्र, 25 डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि 30 डिसेंबरपर्यंत मुंबईच्या अध्यक्षांची निवड होईल, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. मुंबईचा अध्यक्ष घोषित करताना केंद्रातील एखादा नेता उपस्थित असणार आहे, असा कार्यक्रमच चंद्रकांत पाटलांनी सांगितला.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपचे प्रतिष्ठेची बनवल्याचंही दिसून येत आहे. कारण आगामी निवडणुकीनंतर मुंबईचा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला. भाजपच्या या संघटनात्माक बैठकीला चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, व्ही. सतीश, आशिष शेलार यांच्यासह बडे नेते उपस्थित आहेत.

सध्या मुंबई महापालिकेतील पक्षांचे संख्याबळावर नजर टाकल्यास शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे अपक्षांसह सर्वाधिक 94 नगरसेवक आहेत. त्यानंतर भाजप दुसरा मोठा पक्ष असून भाजपचे एकूण 83 नगरसेवक आहेत. तर काँग्रेसचे 29 आणि राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
चाळीतून थेट आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप! मुंबईच्या मुलांची भूतानमध्ये ऐतिहासिक कामगिरी; रविंद्र चव्हाणांकडून भरभरून कौतुक
Vishakha Raut : विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद धोक्यात? शिंदेसेनेच्या सदा सरवणकरांच्या पराभूत लेकीला नगरसेवकपदाची लॉटरी लागणार? 
Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget