एक्स्प्लोर
भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा
महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी माधव भांडारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई : भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण आणि राज्य पुनर्वसन व सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी भांडारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
भांडारी गेल्या अनेक वर्षांपासून आमदारकीच्या शर्यतीत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भांडारी यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र त्यांना डावलून राष्ट्रवादीतून आयात उमेदवार प्रसाद लाड यांना तिकीट देण्यात आलं होतं.
शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीही आयात उमेदवार दिल्याने भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी वाढली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून बढती मिळत असल्याची चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
रायगड
क्रिकेट
Advertisement