एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भाजपच्या 114 जागांच्या यादीवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब
![भाजपच्या 114 जागांच्या यादीवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब Bjp Shortlisted 114 Seats Out Of Total भाजपच्या 114 जागांच्या यादीवर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/24052617/cm-on-aropi-photo-new-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भाजपने मुंबई महापालिकेसाठी तयार केलेल्या 114 जागांच्या यादीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. आज रात्री भाजप आणि शिवसेना एकमेकांची यादी आदान प्रदान करण्याची शक्यता आहे.
मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी याबाबत आशिष शेलार यांच्यासोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यादीवर शिक्कामोर्तब केलं.
5 ते 6 जागांवरुन युतीचं ब्रेक-अप होणार?
शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या युतीबाबत चर्चा सुरु आहे. मात्र सेनेला यादी देण्याऐवजी आशिष शेलार आणि मुख्यमंत्री यांची बैठक होत झाली. भाजपने याआधीही सेनेला 50-50 चा फॉर्म्युला दिला होता.भाजपचा एक्स्क्लुझिव्ह सर्व्हे एबीपी माझाच्या हाती!
दरम्यान भाजपने निवडणुकीआधी केलेला सर्व्हे माझाच्या हाती आला आहे. या सर्व्हेत शिवसेना आणि भाजप यांना समान जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे भाजप 50-50 फॉर्म्युल्यावर दावा करत असल्याचं बोललं जात आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)