एक्स्प्लोर

प्रसाद लाड यांचा काँग्रेस नेत्यांवर 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेत्यांविरोधात 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

मुंबई: भाजप आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेस नेत्यांवर तब्बल 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. भूखंड घोटाळ्याचे आरोप लावून बदनामी केल्याचं लाड यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेत मोठा भूखंड झाल्याचा आरोप करत काँग्रेसने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांची नावं घेतली होती. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत हा आरोप केला होता. यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आता त्यांच्याविरोधात 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. सोमवारी काँग्रेसच्या या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लाड यांच्यावर नवी मुंबई येथील भूखंड खरेदीसाठी बेकायदेशीरपणे बिल्डरला मदत केल्याचा आरोप केला होता. त्या अनुषंगाने लाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात हा दावा दाखल केला आहे. काय आहेत आरोप? नवी मुंबई येथील नियोजित विमानतळाजवळील 24 एकरचा भूखंड अवघ्या 3 कोटी 60 लाख रुपयांत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या निकटवर्तीय बिल्डरला दिल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला होता. तसेच हा भूखंड सध्याच्या बाजारभावानुसार तब्बल 1600 कोटींचा असल्याचा दावाही काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला होता. प्रसाद लाड यांचं स्पष्टीकरण “मूळात या आरोपाला कोणताही आधार किंवा पुरावे नसताना केवळ खोट्या माहितीच्या आधारावर हकनाक माझ्यावर आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फक्त वातावरण निर्मितीसाठीचा काँग्रेसचा हा केविलवाणा प्रयत्न होता”,असं प्रसाद लाड म्हणाले. “मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढले हा काही कोणताही घोटाळा केल्याचा पुरावा असू शकत नाही. माझी अनेक नेत्यांशी आणि व्यावसायिकांशी मैत्री आहे, याचा अर्थ मी त्यांच्या व्यवसायात भागीदार आहे असा होत नाही, तरीही आरोपांबाबत कोणतीही खातरजमा न करता निव्व्ळ मानसिक त्रास देण्याच्या हेतूने, तसेच सामाजिक पत घसरवून माझ्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का देण्याच्या दुष्ट हेतूने हे आरोप करण्यात आले आहेत”, असा दावा प्रसाद लाड यांनी केला. याशिवाय माझ्यावरील आरोपाच्या माध्यमातून सरकारच्या प्रतिमेला धक्का देण्याचाही हा प्रयत्न आहे. त्यामुळे नाईलाजास्तव मला हा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा लागत आहे. या दाव्याबाबत काँग्रेस नेत्यांना नोटीस बजावण्यात येणार असून, ही नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत त्याबाबतचा खुलासा करावा. किंवा २ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील वक्तव्ये आणि आरोप बिनशर्त मागे घेऊन माझी तसेच राज्य सरकारची माफी मागावी, अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे असे खुले आव्हान आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहे. संबंधित बातम्या  मुख्यमंत्र्यांकडून 1767 कोटींची जमीन 3 कोटीत बिल्डरला : काँग्रेस   भाजपचे प्रत्युत्तर, प्रसाद लाड काँग्रेसवर 500 कोटींचा दावा ठोकणार 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Embed widget