एक्स्प्लोर
सुप्रिया ताईंच्या ट्वीटमुळे मला दु:ख झालं : प्रसाद लाड
'पवार साहेब मला नेहमी सांगायचे ‘आरोप झाले की तो माणूस मोठा होतो.’ ताईंनी ट्विट केल्यामुळे माझा राजकीय भाव वाढला. राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे.’

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांची क्रिस्टल कंपनी वादात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. याच टीकेला आता प्रसाद लाड यांनीही उत्तर दिलं आहे.
'मानव तस्करी करुनही फक्त भाजपात आहेत म्हणून प्रसाद लाड पावन झाले का?' असा सवाल उपस्थित करत सुप्रिया सुळे यांनी लाड यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर आमदार प्रसाद लाड यांनीही सुप्रिया सुळेंना उत्तर दिलं आहे. 'मी राष्ट्रवादीमध्ये असल्यापासून बिझनेसमध्ये होतो. त्यामुले ताईंनी माझ्यावर टीका करण्याआधी शहानिशा करणं अपेक्षित होतं.' असं ते यावेळी म्हणाले. प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले? पवार साहेब नेहमी सांगायचे आरोप झाले की तो माणूस मोठा होतो : प्रसाद लाड ‘खासदार सुप्रिया ताईंनी केलेल्या ट्वीटबद्दल मला अतिशय दुःख झालं. मी राष्ट्रवादीमध्ये होतो तेव्हापासून बिझनेसमध्ये आहे. जेव्हा मी त्यांच्या पक्षात होतो तेव्हा हाच व्यवसाय करत होतो. त्यामुळे ताईंनी माझ्यावर टीका करण्याआधी त्याची शहानिशा करणं अपेक्षित होतं. त्यांनी संबंधितांकडून नीट माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. पवार साहेब मला नेहमी सांगायचे ‘आरोप झाले की तो माणूस मोठा होतो.’ ताईंनी ट्विट केल्यामुळे माझा राजकीय भाव वाढला. राष्ट्रवादीने माझा धसका घेतला आहे.’ असं थेट उत्तर प्रसाद लाड यांनी दिलं आहे. दरम्यान, प्रसाद लाड यांच्या या प्रतिक्रियेनंतर सुप्रिया सुळे आता काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..@sureshpprabhu BCAS ने स्पष्टपणे सांगितलेय की क्रिस्टल एव्हिएशन सर्व्हिसेस ही प्रसाद लाड यांची कंपनी मानवी तस्करीच्या प्रकरणात गुंतलीय. एवढा गंभीर आरोप देखील भाजपमध्ये पावन झाला का @narendramodi जी, @Dev_Fadnavis जी हे सर्व तुमच्या डोळ्यादेखत होतेय.हाच का तुमचा पारदर्शक कारभार ?
— Supriya Sule (@supriya_sule) April 27, 2018
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















