एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली, राम कदम पुन्हा ट्रोल
राम कदम यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दुपारी दोनच्या सुमारास अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या मृत्यूचं ट्वीट पोस्ट केलं.
मुंबई : मुलींबाबत बेताल वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार राम कदम पुन्हा अडचणीत सापडले आहे. कॅन्सरवर अमेरिकेत उपचार घेत असलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाबद्दल ट्वीट केल्याने, राम कदम यांना सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
राम कदम यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दुपारी दोनच्या सुमारास अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या मृत्यूचं ट्वीट पोस्ट केलं. "हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी व आपल्या अभिनयाने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड.. त्यांचे अमेरिका येथे निधन झाले आहे...भावपूर्ण श्रद्धांजली," असं हे ट्वीट होतं.
परंतु अनेकांनी या ट्वीटवर रिप्लाय द्यायला सुरुवात केली. ही अफवा असल्याचं समजल्यानंतर दहा मिनिटांतच राम कदम यांनी ते ट्वीट डिलीट केलं आणि "सोनालीच्या निधनाची अफवा असल्याचं सांगणारं नवं ट्वीट केलं. सोनाली बेंद्रे यांच्या निधनाची अफवा दोन दिवसांपासून होती. मी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो," असं त्यांनी म्हटलं.
पण तोपर्यंत उशीर झाला होता. राम कदम यांच्या ट्वीटचा स्क्रीनशॉन सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पुन्हा एकदा राम कदम यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं आहे. तर सोनालीच्या मृत्यूबाबत ट्वीट केल्याने तिचे चाहते राम कदमांविरोधात आपला रोषही व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाला आहे. हायग्रेड कॅन्सरचा साधा अर्थ म्हणजे वेगाने पसरणारा कॅन्सर. सध्या ती अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्रीडा
निवडणूक
Advertisement