Mumbai : मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराचा हायवे झालाय, असा आरोप भाजप (BJP) आमदार मिहिर कोटेचा (Mihir Kotecha) यांनी केला आहे. त्यांनी सांगितले, 'आम्ही घोटाळे बाहेर काढले त्यामुळं महापालिकेचं 450 कोटी वाचले. राणीच्या बागेत दुर्मिळ प्रण्यासाठी वस्तू बनवत आहेत. यात फक्त दोन कंपन्यांना फायदा होणार आहे. यात higway आणि skyway या दोन कंपनीला फायदा पोहोचवण्याचे काम सुरू आहे. याबद्दल मी महापालिकेला पत्र लिहिले. यात 106 कोटी चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. '
पुढे कोटेचा यांनी सांगितले, 'महापालिकेत भ्रष्टाचाराचा हायवे झाला आहे त्याचे निर्माते महापालिका उपायुक्त आहेत. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहेत.'
मिहिर कोटेचा यांनी सांगितले, 'मी फक्त बिल्डरच नाहीतर माझ्याकडे शिपिंग कंपनी आहे आणि हे सगळं मी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे. मी आरोप केल्यानंतर महापौरांनी स्ट्रेचिंग कंत्राट आतील निविदा का? रद्द केली याचे उत्तर त्यांनी द्याव. त्यावेळी मुंबईकरांचे 136 कोटी वाचले होते.'
'मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही याबद्दल मुंबई महापालिकेला पत्र लिहिलं होतं.महापालिकेत भ्रष्टाचाराचा हायवे झाला आहे त्याचे निर्माते महापालिका उपायुक्त आहेत. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला जात आहे. हे कंत्राट रद्द करावे, नाही तर आम्ही कोर्टात जाणार आहोत.' असेही कोटेचा म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
Jitendra Awhad : 'जीव देऊ पण वाचवू'! जितेंद्र आव्हाड यांचा मध्य रेल्वेला इशारा
Instagram Paid Subscription : इंस्टाग्राम आणणार नवं फिचर; रिल्स, व्हिडीओ बनवण्यासाठी सबस्क्रिप्शन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha