एक्स्प्लोर

Ashish Shelar : संजय राऊत मानसिक रुग्णतेच्या सर्वोच्च स्थानावर; शेलारांची शेलकी टीका

BJP MLA Ashish Shelar on Sanjay Raut : शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर शेलकी टीका केली.

BJP MLA Ashish Shelar on Sanjay Raut : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानवर संजय राऊत पोहचलेत अशी शेलकी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ याच असे आव्हानही शेलार यांनी संजय राऊत यांना दिले. येत्या काही दिवसात शिवसेना विरुद्ध भाजप असा राजकीय कलगीतुरा आणखी रंगण्याची चिन्हं आहेत. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडी कारवाईच्या मुद्यावरून भाजपवर काही दिवसांपूर्वी टीका केली होती.  आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्त्युतर दिले. संजय राऊत हे एकाकी पडले असून त्यांना महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याची साथ नसल्याचेही शेलार यांनी म्हटले. ईडीकडून चौकशीचा ससेमिरा  सुरू आहे त्यामुळे संजय राऊत यांचा थयथयाट सुरू असल्याचे शेलार यांनी म्हटले. संजय राऊत मागील सात वर्षांपासून भाजपला बदनाम करत आहे. पण सात वर्षे ईडी मागे का लागली नव्हती असाही मुद्दा शेलार यांनी उपस्थित केला. 

शिवसेनेत राऊत एकाकी 

संजय राऊत आज एकाकी पडले आहेत. त्यांच्या बाजूने शिवसेनेचा एक नेता सुद्धा बोलायला तयार नाही. ज्यांच्या मांडीवर राऊत जाऊन बसलेत. त्या राष्ट्रवादीकडून सुद्धा राऊत यांना साथ दिली नाही. मला राऊत यांची चिंता वाटायला लागली असल्याचे शेलार यांनी म्हटले. 

महापालिका निवडणूक वेळेत व्हाव्यात 

लोकशाही मध्ये निवडुक वेळेत व्हायला हवी असे आशिष शेलार यांनी म्हटले.  सत्तेमध्ये तुम्ही बसलात जे आश्वसन दिले ते 5 वर्षात पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत, मुख्यमंत्र्यांच्या जागेची निवडणूक झालीच पाहिजे, हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षाची मागजी होती. मग मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेत का नाही ? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला.  कोरोनाच्या काळात 2 पोटनिवडणुका झाल्यात. त्याचा प्रचारदेखील झाला. आता महापालिका निवडणुकांबाबत शंका निर्माण होत असल्याचे शेलार यांनी म्हटले. महापालिकेवर प्रशासक बसविण्यामागे कुठला छुपा डाव तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या

Caste Validity Certificate Online Process: जात वैधता प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकी प्रोसेस काय?, A टू Z माहिती
जात वैधता प्रमाणपत्र आता फक्त ऑनलाइन मिळणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, नेमकी प्रोसेस काय?, A टू Z माहिती
Parth Pawar NCP: मोठी बातमी! पार्थ पवार यांनी गेम फिरवला, 5 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघेंची मुंबईच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती; राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना पुन्हा मोठा झटका?
मोठी बातमी! पार्थ पवार यांनी गेम फिरवला, 5 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघेंची मुंबईच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती; राष्ट्रवादीमधील बड्या नेत्यांना पुन्हा मोठा झटका?
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar : वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
वसतिगृहात फिजिओथेरपीच्या विद्यार्थिनीने गळ्याला लावली दोर; रूममेटला कॉलेजला जाण्यासाठी नकार दिला, त्या गेल्यानंतर..., छत्रपती संभाजीनगरमधील घटना
IND vs NZ 2nd Test Day-1 : 110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
110/1 वरून थेट 110/4! फक्त 16 चेंडूत धडाधड 3 फलंदाज OUT, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा कमबॅक, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
IND vs SL : पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! आशिया कप स्पर्धेतून बाहेर, रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
पंचांच्या निर्णयांनी भारताला रडवलं! रिंकूची वादग्रस्त विकेट ते श्रीलंकेच्या फलंदाजांवर मेहेरबानी... सेमीफायनलमध्ये नेमकं काय घडलं?
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Embed widget