एक्स्प्लोर

गणेशभक्तांची आणि लालबागच्या राजाची ताटातूट का करताय? आशिष शेलारांचा सवाल

लालबागचा राजा मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, असं आशिष शेलार यांनी सूचवलं.

मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीला मान देत मुंबईतील सर्व प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या उत्सवाला छोटं स्वरूप दिलं आहे. मात्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदाचा उत्सव रद्द केल्याचं काल जाहीर केलं. लालबागचा राजाची 87 वर्षांची परंपरा आहे, ती खंडित न करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. कोरोनासंबंधी शासनाचे सर्व नियम पाळून उत्सव साजरा करण्याचं आवाहन करत गणेशभक्तांची आणि लालबागच्या राजाची ताटातूट का करताय? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.

आशिष शेलार ट्वीटमध्ये म्हटलं की, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आलाय. पण बाप्पा मार्ग काढेल. मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी यांनी मूर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवणार.. त्यांचे कौतुकच!

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबवण्याचा घेतलेला निर्णय 'स्तुत्यच'. पण मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची 'हीच ती वेळ'.

संकट मोठे आहे, अशावेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाईन दर्शन सुद्धा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते. या देशात श्रध्देला मोल नाही. श्रद्धा तोलून ही पाहता येत नाही. म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी? असं आशिष शेलार यांनी म्हटलं.

लालबाग गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी यंदाचा गणेशोत्सव रद्द करत असल्याचं सांगितलं. त्यांच्या निर्णयाला हजारो भक्तांनी पाठिंबा दर्शवला. यंदा उत्सव रद्द करून कोरोना आरोग्योत्सव आयोजित करत असल्याचं साळवी यांनी सांगितलं. यावेळी सांगताना सुधीर साळवींनी आरोग्योत्सव साजरा करणार म्हणजे काय करणार तर...

- गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार नाही. मात्र, भविष्यात तीच मूर्ती कायम राहणार. - अकरा दिवस फक्त रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपीसारखे आरोग्यसेशी संबंधित उपक्रम राबवणार. - कोरोना लढ्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबातील 20 वीरमातांचा सन्मान करणार. - गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपत्नींचा सन्मान करणार. - मुख्यमंत्री सहायता निधीत 25 लाख रुपये जमा करणार.

Ganeshotsav 2020 | शासनाचे नियम पाळून उत्सव साजरा करा; आशिष शेलार यांचं लालबागचा राजा मंडळाला आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget