एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तिकीटवाटपाचा अधिकार फडणवीस-दानवेंना, बैठकीत निर्णय
मुंबई : वर्षावर सुरु असलेली भाजप नेत्यांची बैठक संपली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बैठकीत देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे हे नेते उपस्थित होते. राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा झाली.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर
- जिल्हा परिषद स्तरावरुन युतीबाबत प्रस्ताव आले तर मान्यता द्यावी, असं बैठकीत ठरलं
- जिल्हा परिषद निवडणुकीत अद्याप कुठेही युतीचा प्रस्ताव आलेला नाही
- काही ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकांत युतीसाठी चर्चा सुरु आहे पण अजून त्यात ठोस काही नाही
उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यास तयार राहण्याचे संकेत
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना स्वबळावर लढण्यासाठी तयार राहण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शाखा निहाय बैठकीत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना याबाबतच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मातोश्री येथे वर्सोवा, अंधेरी पूर्व–पश्चिम, विलेपार्ले आणि वांद्रे पूर्व–पश्चिम येथील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यावेळी उद्धव यांनी स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आता असे लढा की या पुढे कोणाकडेच जाण्याची गरज लागणार नाही, स्वबळावर आपला महापौर बसवू असे स्पष्ट शब्दात सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement