एक्स्प्लोर
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या; इस्त्रीचे चटके, शॉक दिल्याचा संशय
रुपाली चव्हाण या भाजपा युवतीची वसई-विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या.

नालासोपारा : नालासोपाऱ्यात भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रुपाली चव्हाण असं त्यांचं नाव असून त्या 32 वर्षांच्या होत्या. रुपाली चव्हाण या भाजपा युवतीची वसई-विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. नालासोपारा पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटमधील बी विंगच्या 101 नंबर फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. महत्त्वाचं म्हणजे त्यांची दोन दिवसापूर्वी हत्या झाली आहे. त्यांच्या शरीरावर वार केले आहेत. तसंच इस्त्रीचे चटके आणि शॉकही दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















