BJP Leader Pravin Darekar :  भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे चौकशीसाठी माता रमाबाई आंबडेकर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. मुंबई बँकत मजूर असल्याची नोंद करून संचालक मंडळावर गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. यावेळी पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.


मुंबई बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रवीण दरेकरांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबईतील रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात त्यांना आज चौकशीला हजर राहण्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आम आदम पक्षातर्फे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दरेकरांना आज चौकशीला बोलावलं आहे. दरम्यान चौकशीत पोलिसांना सर्व सहकार्य करणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.


राज्य सरकारच्या दबावाखाली FIR दाखल; प्रवीण दरेकरांचा आरोप


माझ्यावर एफआयर दाखल करण्याची पोलिसांना खूप घाई झाली होती. त्यांच्यावर राज्य सरकारचा दबाव होता. मुख्यमंत्र्यांचा देखील कारावाईचा अट्टाहास होता. राज्य सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल झाला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. त्यांना पूर्ण माहिती देणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.


पोलिसांना जे जे काही हवं त्याची तपशीलवार माहिती देणार आहे. आम्ही कुठेही अक्रास्थळीपणा करणार नाही. तपास यंत्रणेला दोष देणार नाही असेही दरेकर म्हणाले. या यंत्रणा तुमच्या दबाबाखाली काम करतात असे आरोप आम्ही करु शकलो असतो. पण आम्ही असे करणार नाही, आम्ही त्याला सामोरे जात असल्याचे दरेकर म्हणाले.


प्रकरण काय?


मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर यांनी मजूर या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. ते बिनविरोध निवडून आले होते. मात्र, मुंबई सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवले होते. 1997 पासून मजूर असलेल्या दरेकर यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha