Mohit kamboj on Nawab Malik : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपा अनेक आरोप केले आहेत. कॉर्डिलिया क्रूझ पार्टी प्रकरणापासून या संबंधात अनेक आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. 2021 हे वर्षही असेच गेला. आता नव्या वर्षातही आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरुच आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा एनसीबी, समीर वानखेडे आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत प्रत्यारोप केले आहेत.


भाजप नेते भारतीय कंबोज यांनी ट्विट करत ''हा पाहा नवाब मलिकांचा फर्जिवाडा'' असं म्हटलं आहे. कंबोज यांनी ट्विट करत एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यामध्ये एक ई-मेल पाहायला मिळतोय. हा ई-मेल एका व्यक्तीने मुंबई पोलीस आयुक्तांना केल्याचा दावा करण्यात आला आहे. या मेलमध्ये त्या व्यक्तीने आपण ड्रग्ज केसमधील साक्षीदार असल्याचे म्हटलं आहे. या व्यक्तीने मुंबई पोलिसांना ईमेल द्वारे तक्रार करत आपल्या जीवाला धोका आहे, असं म्हटलं आहे. यामेलचा स्क्रिनशॉट मोहित कंबोज यांनी शेअर केला आहे.



या स्क्रिनशॉटमध्ये अरबाज उकानी व्यक्तीच्या नावाने मुंबई पोलीस आयुक्तांना एक मेल पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्यक्तीने मेलमध्ये लिहीले आहे, ''मी एनसीबीच्या एक किंवा दोन प्रकरणांमध्ये साक्षीदार म्हणून काम केले आहे. एनसीबीच्या कर्मचार्‍यांनी ड्रग पेडलर्स आणि अंमली पदार्थांवर कारवाई करून निःसंशयपणे उल्लेखनीय काम केले आहे. आर्यन खान प्रकरणानंतर एनसीपीच्या एका नेत्याने म्हणजे नवाब मलिक यांनी मला मीडियासमोर बोलण्याची धमकी दिली आहे.   मला एनसीबी विरुद्ध बोलण्यासाठी 30 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. तसेच एनसीबी विरुद्ध बोला अन्यथा भयंकर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही देण्यात आली आहे. कृपया मला मदत करा. माझ्या जीवाला धोका आहे.''


भाजप नेते मोहित कंबोज यांनी या संबंधित स्क्रिनशॉट शेअर करत मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप केला आहे. दरम्यान मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपावर निशाणा साधला.  समीर वानखेडेंना त्याच पदावर कायम ठेवण्यासाठी दिल्लीतून एका बड्या भाजप नेत्याचं लॉबिंग सुरु असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha