मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. भाजपच्या अनेक नेत्यांनी राऊतांवर ताशेरे ओढले. त्यातच भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी देखील राऊतांवर निशाणा साधला. तुम्ही माझ्यासोबत दुबईला चला, आपण तिथे जाऊन पार्टी करु. तुम्ही येत नसाल तर तुमच्या डीटेक्टीव एजन्सीला पाठवा. तिला माझे फोटो मिळतील, असं म्हणत मोहित कंबोज यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. 


तुम्हाला दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात डोकावून बघण्याची सवय आहे, असा आरोप देखील यावेळी मोहित कंबोज यांनी राऊतांवर केलाय. संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर भाजप नेत्यांकडून संजय राऊतांवर एकच निशणा साधण्यात आला. संजय राऊतांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं नसल्याचं आरोप देखील भाजप नेत्यांनी यावेळी केला. 


मोहित कंबोज यांनी काय म्हटलं?


मी दोन दिवसांसाठी दुबईला जात आहे. तुम्हाला दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात डोकावून बघण्याची सवय आहे. कोण कुठे येतो, कुठे जातो, कोण कसिनो खेळतो, कोण डिस्कोला जातो या सगळ्याची माहिती तुम्हाला हवी असते. तुम्हालाही पार्टीची आवड आहे. तुम्ही लपून छपून कुठे जाता हे सगळं आम्हाला माहित आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत दुबईला चला, तिथे आपण मिळून पार्टी करु. तुम्ही येत नसाल तर तुमच्या डिटेक्टिव एजन्सीला सांगा, म्हणजे तुम्हाला हवे असलेले फोटो मिळतील, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं. 


डोक्यावर परिणाम झालाय - मोहित कंबोज


संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचं मोहित कंबोज यांनी यावेळी म्हटलं. यावर बोलताना मोहित कंबोज म्हणाले की, तुम्ही तुमच्या डोक्यावर उपचार करुन घ्या. हो पण तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, कारण तुम्ही आरोपी आहात. तुम्हाला लूक आऊट नोटीस दिली गेलीये. त्यामुळे तुम्हाला बाहेरही फिरता येणार नाही. 


चंद्रशेखर बावनकुळेंच प्रत्युत्तर 


व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, पण एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही. आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो असतो, त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ कसिनोमधील एक फोटोकेला होता. त्यामध्ये बावनकुळे यांनी कसिनोमध्ये तीन तासात तीन कोटी उधळल्याचा आरोपही केला होता. त्यावर आता बावनकुळे यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली. 


हेही वाचा : 


Chandrashekhar Bawankule : वाचाळविरांनो, औकातीत बोला, महाराष्ट्र हे संस्कार जपणारे राज्य; चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना इशारा