नाशिक: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर असताना वाचाळविरांचा चांगलाच समाचार घेतला. वाचळवीरांनी औकतीत बोलावे, महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्यासाठी बोलले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. तर पंकजाताई मुंडे कुठेही नाराज नाहीत असंही त्यांनी सांगितलं.  मकाऊ प्रकरणावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.


पंकजा मुंडे नाराज नाहीत 


चंद्रशेखर बावनकुळे हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या की, पंकजा मुडे यांच्या नेतृत्वाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांच्या नाराजीने विरोधकांचा काही फायदा होईल असे अनेकांना वाटते. पण पंकजाताईंच्या रक्तारक्तात भाजप आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तुत्वाने उभा राहिलेला महाराष्ट्रात पंकजाताई कधीही नाराज राहू शकत नाहीच. खरं तर पक्ष हा मोठा आहे. पंकजाताई पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. निश्चितपणे पंकजा ताई महाराष्ट्रात आणि देशात चांगल्या लेव्हलला नेतृत्व करतील अशी अपेक्षा आहे. 


सरकारची उत्तरे सरकार देईल, मी काही कोणावर उत्तर देणार नाही असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी लोकसभेच्या कामासाठी आलो आहे. मी त्यावर काम करेल. सुपर वॉरियर्स लोकांच्या घरी जावून मोदींचे कार्य समजावून सांगतील. ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल ते बघणार आहोत. मोदी तिसऱ्या वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. राज्यात महायुतीचे 45 प्लस खासदार निवडून येतील.


एका फोटोवरून इमेज खराब करू नका


व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, पण एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही. आपण हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो, पण त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कसिनो असतो, त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितलं. शिवसेनेचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ कसिनोमधील एक फोटो (Chandrashekhar Bawankule Hing Kong Macau Casino Photo) केला होता. त्यामध्ये बावनकुळे यांनी कसिनोमध्ये तीन तासात तीन कोटी उधळल्याचा आरोपही केला होता. त्यावर आता बावनकुळे यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली. 


ही बातमी वाचा: