Kirit Somaiya Press : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तरं देताना आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे की, अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जर लिहून दिलं की असं केलेलं नाही तर एक नाही दोन जोडे मारा. मी माझे जोडे संजय राऊतांना देतो, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या पायातील जोडे हातात घेऊन दाखवले. 


काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.


राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार


त्यांनी म्हटलं की, संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी बंगल्यांचा टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. 19 बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले. 


2013 ते 2021 या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी बोलताना किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला कर भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधीमी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला.


कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटळ्याची चौकशी करण्याची मागणी


दरम्यान, यावेळी किरीट सोमय्या यांनी कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटळ्याची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली. कोवीड सेंटरमधील घोटाळ्याच्या चौकशीची भिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना वाटत असल्याचे सोमय्या म्हणाले. मी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी लढत आहे. मला जर ब्लॅकमेलर म्हणत असतील तर चुकीचे आहे असे सोमय्या म्हणाले.


1 एप्रिल ते 2013 ते 31 मार्च 2021 पर्यंतचा 19 बंगल्याचा कर यांच्या खात्यातूनच गेला आहे. 11 नोव्हेंबर 2020 ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जमिनीचे तसंच व्यवसायिक संबंध मी उघड केले होते. अन्वय नाईक यांनी 2008 मध्ये बांधले होते. हा ठाकरे सरकारनेच दिलेला रेकॉर्ड आहे. 2009 पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे. आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर हा कर भरत होत्या, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.


सोमय्या म्हणाले की, ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड गेल्या वर्षी मी मिळवला आहे. त्यात ग्रामपंचायतीने रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्यातर्फे 30 जानेवारी 2019 रोजी घरपट्टी नावे करण्याचा अर्ज आला असून मान्य करण्यात आल्याचं नमूद आहे. रश्मी ठाकरेंच्या नावाने घरं दाखवत आहेत. इतकंच नाही तर रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी एप्रिल 2014 मध्ये करार केला. त्यात घरं असल्याचे पुरावे त्यांनी जोडले असून किरीट सोमय्या, नील सोमय्या यांनी जोडलेले नाहीत. महत्वाचं म्हणजे हे घर वनविभागाच्या जमिनीवर बांधण्यात आलं आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.


इतर संबंधित बातम्या


Kirit Somaiya : बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? किरीट सोमय्यांचा सवाल


Kirit Somaiya : खुशाल चौकशी करा, मी मुलासह जेलमध्ये जाण्यास तयार, पण... किरीट सोमय्यांचं प्रतिआव्हान