Sanjay Raut On ED and Kirit Somaiya: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले. ईडीच्या कारवाईची धमकी देऊन सोमय्या यांनी शेकडो कोटी रुपये जमवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. सोमय्या यांनी 15 कोटी रुपये ईडीच्या एका अधिकाऱ्याला दिली असल्याचा सनसनाटी आरोप राऊत यांनी केला. राऊत यांनी पुन्हा एकदा ईडीलादेखील आव्हान दिले आहे.
किरीट सोमय्या यांनी ईडी कारवाईची धमकी देऊन मुंबईतील जेव्हीपीडी येथील एक भूखंड बिल्डर असलेला मित्र अमित देसाई याला मिळवून दिला. या भूखंडाची किंमत 100 कोटींहून अधिक आहे. मात्र, ईडी कारवाईची धमकी देऊन सोमय्या यांनी हा भूखंड कमी किंमतीत मिळवून दिला. किरीट सोमय्या यांनी 15 कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्याला दिले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
राऊतांचे ईडीला आव्हान
संजय राऊत यांनी ईडीला पुन्हा एकदा आव्हान दिले. सोमय्या यांनी 15 कोटी दिलेल्या अधिकाऱ्याबाबत ईडीने माहिती द्यावी, अन्यथा त्या अधिकाऱ्याचे नाव मी उघड करणार असल्याचे आव्हान राऊत यांनी दिले.
सोमय्या कोण आहे? राऊतांचा सवाल
किरीट सोमय्या हे कोण आहेत, असा सवाल राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. किरीट सोमय्या हे भाजप नेते म्हणून बोलत आहेत, असे भाजपने जाहीर करावे असेही राऊत यांनी म्हटले. किरीट सोमय्या यांनी बंगले कुठे आहेत, ते दाखवावे असे पुन्हा आव्हान देताना राऊत यांनी माझी बेनामी संपत्तीही सोमय्या यांनी दाखवावी असे आव्हान दिले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Kirit Somaiya : बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? किरीट सोमय्यांचा सवाल
- Kirit Somaiya Press Conference : निकॉन कंपनीशी निल सोमय्यांचा संबंध आहे की, नाही? किरीट सोमय्या म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha