नवी मुंबई :  नवी मुंबईत भाजपाला मोठा धक्का  बसणार  आहे. नवी मुंबईतील भाजपाचे नऊ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे. या नऊ नगरसेवकांनी आज शरद पवार यांची भेट घेतली  आहे.   

Continues below advertisement

भाजप वरिष्ठ नगरसेवक आणि मनपा माजी सभागृह नेते रविंद्र इथापे यांच्या नेतृत्वाखाली करणार नऊ नगरसेवक लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. या नगरसेवकांनी जेव्हा शरद पवारांची भेट घेतली त्यावेळी जितेंद्र आव्हाड , दिलीपराव वळसे पाटील, सुनिल तटकरे उपस्थित  होते.  नवी मुंबईत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग सुरू झालेली असतानाच आता राष्ट्रवादीतही आता इनकमिंग सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबईत राजकीय हवा अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

 त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादीकडून भाजपला शह देण्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडू देखील आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. 

Continues below advertisement

नवी मुंबईत  एकूण 122 वॉर्ड असणार आहेत. यावेळची निवडणूक ही पहिलीच निवडणूक असेल जी पॅनल पध्दतीने लढली जाणार आहे. त्यामुळे तीन वॉर्डांचा एक प्रभाग असे 40 प्रभाग, तर शेवटच्या दोन वॉर्डांचा मिळून एक प्रभाग असे एकूण 41 प्रभाग पाडण्यात आले आहेत. शहरातील 11 लाख 20 हजार 547 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 1 लाख SC मतदार तर 18 हजार 913 ST मतदार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

नवी मुंबई पालिकेची प्रभाग रचना जाहीर, पॅनल पध्दतीने होणार निवडणूक, 122 वाॅर्डचे 41 प्रभाग तयार

नवी मुंबई पालिकेचा अभिनव उपक्रम, आता बसमध्येही ग्रंथालयाची सुविधा

पायाभूत सुविधा आणि घरांच्या उभारणीसाठी अर्थसंकल्प सकारात्मक, घरे स्वस्त होण्याचा जाणकारांचा अंदाज

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha