Mumbai Cruise Drugs Case : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरुन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये रोज आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु आहे. नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या वादात आता भाजप नेते हाजी अराफत शेख एन्ट्री झालीय. महाराष्ट्रतील भाजप नेते हाजी अराफत शेख आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांचे उत्तर देत, खळबळजनक खुलासे करणार आहेत.


नवाब मलिकांनी काल पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. सोबतच बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं सुरु होता. बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचं रॅकेट चालवत होते त्याला तत्कालिन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता. मलिक म्हणाले की,  खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचं काम समीर वानखेडेंनीच केलं.  खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते, असं ते म्हणाले. खोट्या नोटांच्या रॅकेटमधील इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेख हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करुन अल्पसंख्याक कमिशनचा अध्यक्ष आहे, असं मलिक म्हणाले. मलिकांच्या याच आरोपांना आज हाजी अरफात शेख उत्तर देणार आहे.


नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे : हाजी अराफत शेख


बुधवारी नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यावर भाजप नेते हाजी अराफत यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. हाजी अराफत शेख यांनी सांगितले की, नवाब मलिक यांनी फिल्म सुरू केली आहे, पण आम्ही ती पूर्ण करू. तर नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, त्यांना तातडीने मानसिक उपचारांची गरज असल्याचं हाजी अराफत शेख यांनी सांगितले.


नवाब मलिक यांनी आरोप केला की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाजी अराफत यांच्या धाकट्या भावाला वाचवण्यासाठी आणि बनावट नोटांच्या रॅकेटला संरक्षण देण्याचे काम केले. नवाब मलिक यांच्या आरोपानंतर भाजप नेते हाजी अराफत शेख यांनीही या लढ्यात उडी घेतली. नवाब मलिकसोबत माझा भाऊ इम्रान शेख याचा फोटो असल्याचे अराफत यांनी सांगितले. ती त्याच्या लग्नात सामील आहे. मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केक कापलाय. ही सर्व चित्रे आहेत. माझ्याकडे बॉम्ब नाही पण नवाब मलिकांची छोटी-मोठी सर्व प्रकरणे मी उघडकीस आणणार असं हाजी अराफत शेख यांनी सांगितले.



कोण आहेत हाजी अराफत शेख?


हाजी आरफत शेख हे विद्यार्थी सेना आणि भारतीय विद्यार्थी  सेनेत सक्रीय होते 


मनसेचे उपाध्यक्ष आणि वाहतूक विभागाचे प्रमुख  देखील झाले 


2014  मध्ये शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश केला आणि  सेनेचे उपसभापती बनले 


महाराष्ट्र शिव वाहतूक  सेनाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 


2018 मध्ये भाजपमध्ये  प्रवेश केला. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक


संबंधीत बातम्या


Hazi Arafat Shaikh : बनावट नोटांचे रॅकेट चालवल्याचा आरोप झालेले हाजी आराफत शेख कोण आहेत?