Hazi Arafat Shaikh : बनावट नोटांचे रॅकेट चालवल्याचा आरोप झालेले हाजी आराफत शेख कोण आहेत?
नवाब मलिकांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना हाजी आराफत शेख म्हणाले की, "मी नेमकी ही प्रेस कॉन्फरन्स ऐकली नाही मात्र पत्रकारांकडून केलेल्या आरोपांची माहिती मिळाली.नवाब मलिक यांची तब्येत सध्या ठीक नाही, गेले काही दिवस ते कोणाची बायको काय करते? कोण काय कपडे घालते? हे बाहेर काढत आहे जे मंत्र्यांना शोभत नाही. नवाब मलिक यांचे खबरी त्यांना योग्य माहिती देत नाहीयेत. माझ्या भावाच्या प्रकरणाला फडणवीस यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र तेव्हा मी भाजप मध्ये नव्हतो, मी शिवसेनेत मोठ्या पदावर काम करीत होतो."