मुंबई : येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.  आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरवण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी  वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत.  बीकेसी मध्ये 2400 बेडपैकी  800 बेड्स वर रुग्ण अॅडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आहे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात.  ज्यांचे लसीकरण झाले त्यातील 99.99 लोक हे सुरक्षित आहेत, असं सोमय्या म्हणाले. 


सोमय्या म्हणाले की, सत्ताधारी नेते आणि त्यासोबत काही आयएएस अधिकारी मुद्दामून ज्या पद्धतीने टेरर घाबरवण्याचे काम करत आहेत ते का?  कारण कारण कोविड सेंटर हे त्यांच्यासाठी कमाईचे साधन आहे.  येत्या दहा दिवसात मी ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा प्रसिद्ध करणार असल्याचं ते म्हणाले.  येत्या दहा दिवसात या सगळ्या घोटाळ्यांचे कागदपत्र मी जनतेसमोर आणणार आहे, असं ते म्हणाले. 


सोमय्या म्हणाले की, मुंबई महापालिकेचे आयुक्त इतकं टेन्शन का पसरवत आहेत. आर्थिक कमाईसाठी सत्ताधाऱ्यांकडून घाबरण्याचं काम सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. 


आशिष शेलार यांना आलेल्या धमकीच्या फोनवर बोलताना सोमय्या म्हणाले की,  शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत. बघूया ठाकरे सरकार कशी काळजी घेतात. 



महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha