Jumbo Mega Block : मध्य रेल्वेवर 36 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर 36 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक असेल. हा मेगा ब्लॉक 08 जानेवारी (शनिवार) रोजी दुपारी 02.00 ते 10 जानेवारी (सोमवार) रोजी दुपारी 02.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल.


शनिवारी दुपारी 2 वाजेपासून सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत ठाणे-दिवा स्थानका दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा बंद असणार आहे. 36 तासांच्या जम्बो मेगा ब्लॉकमध्ये किमान 390 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. सोमवारी, लोकल गाड्या पुन्हा सुरू झाल्यावर, स्लो मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन मार्गावर प्रवास करता येईल.






मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ शिवाजी सुतार यांनी सांगितले की, ''या 36 तासांच्या ब्लॉक दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावरील सुमारे 390 उपनगरीय रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, 18 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जातील आणि चार लांब पल्ल्याच्या गाड्या कमी केल्या जातील.''


ठाणे-दिवा 5व्या आणि 6व्या मार्गाच्या संबंधात नवीन टाकलेल्या ट्रॅकचे कट आणि कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. 


महत्त्वाच्या बातम्या :


Maharashtra Unseasonal Rain : मुंबई, ठाण्यात हलक्या पावसाच्या सरी, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha