Mumbai Corona lockdown update : देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अतिवेगाने वाढत आहे. काल दिवसभरात मुंबईत 20 हजार पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मिळाली आहे. दुसरीकडे मुंबईच्या कुर्ला लोकमान्य तिलक टर्मिनसचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात लॉकडाऊनच्या भीतीमुळे मोठ्या संख्येमध्ये परप्रांतीय मजूरांनी आपल्या गावी जाण्यासाठी कुर्ला टर्मिनसवर गर्दी केली आहे. मात्र या संदर्भात कुर्ला आरपीएफ पोलिसांनी माहिती दिली आहे की रात्री 11 ते बाराच्या सुमारास कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसमधून 6 ट्रेन वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाण्यासाठी निघतात. त्या ट्रेनमध्ये तिकिट बुकिंग केलेल्या लोकांना आतमध्ये सोडलं जात आहे. याच ट्रेनमध्ये बसण्यासाठी कुर्ला टर्मिनसवर प्रवाशांचा गर्दी दिसत आहे. या प्रवाशांचे कोरोना नियमांचे सर्व पालन करून ट्रेनमध्ये जायला परवानगी दिली जात आहे,अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.
मुंबईमध्ये वाढत असलेल्या कोविडच्या संकटामुळं लॉकडाऊनच्या संकटाची शक्यता वर्तवली जात आहे. कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनसवर परप्रांतियांची गावी जाण्यासाठी गर्दी वाढत असल्याचं समजताच एबीपी न्यूजनं तिथं जाऊन याबाबतची माहिती घेतली. एका व्यक्तिशी चर्चा केल्यानंतर त्यानं सांगितलं की, मी पेंटिंगचं काम करतो. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं मला माझ्या मालकानं आता काही काम नसल्याचं सांगितलं आहे. सोबतच मला गावी जाण्याचं सांगितलं आहे. मी पश्चिम बंगालचा आहे, त्यामुळं तात्काळमध्ये तिकिट काढून गावी परतत असल्याचं मंडल नावाच्या या व्यक्तिनं सांगितलं.
आणखी काही प्रवाशांशी आम्ही चर्चा केली. अशोक खालखा हे त्यांचे मित्र राम पुजारी, सूरज लाल, साईनाथ यांच्यासह आपल्या राज्यात परतत होते. त्यांना लॉकडाऊनची भीती आहे, ते सर्वजण एक मच्छीमार्केटमध्ये काम करतात.
सोशल मीडियावरील बातमी खोटी
काल सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती. ज्यामध्ये मोठ्या संख्येनं लोक स्थलांतर करत असल्याचं म्हटलं जात होतं. यामुळं एलटीटीवर मोठी गर्दी झाली झाली असून पोलिसांनी गर्दी हटवण्यासाठी लाठीचार्ज केला असल्याचं या बातमीत म्हटलं गेलं होतं. याविषयी आम्ही LTT रेलवे स्टेशनचे RPF अधिकारी केके राणा यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितलं की, ही बातमी खोटी आहे. कुठलाही लाठीचार्ज झालेला नाही. ज्यांच्याकडे तिकिट आहे, अशाच प्रवाशांना रेल्वेस्थानकात सोडलं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या