अजित पवार यांचं ट्वीट
अजित पवार यांच्या ट्विटरवर यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ''कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या फळीत लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांसाठी मुंबईतील पवई रोटरी क्लबच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे 'एन 95 मास्क', 'वॉशेबल मास्क', 'पीपीई किट', 'सॅनिटाईझर' आदी उपयुक्त वस्तू सुपूर्द करताना पवई रोटरी क्लबच्या अध्यक्ष गिरीजाताई देशपांडे व त्यांचे सहकारी. मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड व रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.'' असं ते ट्वीट आहे. यात देवांग दवे देखील आहे. यानंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काही नेटिजन्सनी सवाल केले आहेत.
जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत दिलं स्पष्टीकरण
यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलं आहे. तो देवांग दवे आहे हे माहीतच नव्हतं असं त्यांनी म्हटलं. आव्हाड यांनी जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी अद्याप अजित पवार यांनी यावर कुठलंही भाष्य केलेलं नाही.
देवांग दवेवर काय आहेत आरोप
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीच्या काळात सोशल मीडियाचे काम भाजप पदाधिकाऱ्यांशी संबंधित कंपनीला दिल्याचा गंभीर आरोप साकेत गोखले यांनी ट्विटरवर केला होता. त्यांच्या माहितीनुसार भाजप पदाधिकारी आयटी सेल सांभाळणाऱ्या देवांग दवे याची कंपनी आणि निवडणूक आयोगाने ज्यांना काम दिलं त्याच्या कंपनीचा पत्ता एकच आहे. विशेष म्हणजे सोशल सेंट्रल या ज्या कंपनीला काम दिले त्या कंपनीच्या ग्राहकांच्या लिस्टमध्ये भाजप आहे.
त्यामुळे या कंपनीने मतदारांच्या माहितीचा गैरवापर केला का? यावर साकेत गोखले यांनी प्रश्न उपस्थित केला. तसंच निवडणूक आयोगाकडील महत्वाची आणि गोपनीय माहिती वापरली गेली का? यावरही साकेत गोखले यांनी ट्विटरवरून प्रश्न उपस्थित केला होता. निवडणूक आयोगाने या ट्विटची दखल घेऊन या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाकडून अहवाल देखील मागवला. गोखले यांनी केलेल्या आरोपानंतर काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
निवडणुकीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाचं काम : पृथ्वीराज चव्हाण
निवडणुकीच्या काळात भाजप पदाधिकाऱ्याला निवडणूक आयोगाचं काम : पृथ्वीराज चव्हाण