एक्स्प्लोर

शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची भाजपची तयारी: सूत्र

मुंबई: मुद्दा कुठलाही असो, शिवसेनेचा सरकारला विरोध ठरलेला आहे. त्यामुळे वैतागलेल्या भाजप नेत्यांनी आता मध्यावधींना सामोरे जाऊ पण शिवसेना नको, असा सूर लावला आहे. आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेच्या वर्तणुकीवर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशी महिती सुत्रांनी दिली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेच्या कायम असणाऱ्या विरोधी भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत यासंबंधी दोन पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पहिला पर्याय म्हणजे थेट मध्यावधी निवडणुका घेण्यात याव्या. तर दुसरा पर्याय म्हणजे भाजपच्या संपर्कात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून भाजपच्या चिन्हावर निवडून आणावं अशीही भाजपनं तयारी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला जाण्याची चिन्हं आहेत. नेहमी सरकारला अडचणीत आणण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर भाजप आक्रमक झालं आहे. शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची भाजपची तयारी: सूत्र काय झालं कोअर कमिटीच्या बैठकीत? कोअर कमिटीच्या बैठकीत झाली दोन पर्यायावर चर्चा झाली. पहिला पर्याय: थेट मध्यवर्ती निवडणुकांना सामोरे जाणं. दुसरा पर्याय: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फोडून त्यांना पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडून आणणं. - काँग्रेसचे 15 आणि राष्ट्रवादीचे 14 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. यातील 21 आमदार जे पुन्हा नक्की निवडून येऊ शकतात अशांना भाजप घेऊ शकते. - या दोन्ही पर्यायांवर 50-50% मत कोअर कमिटीमध्ये पडली. त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा याबाबत दिल्लीला कळवण्यात येणार असल्याचं समजतं आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाचे आमदार निलंबित केल्यावर शिवसेनेनं या निलंबित आमदारांचे निलंबन रद्द करण्यात यावं अशी भूमिका घेतली. शिवसेनेच्या या वर्तणुकीमुळे सरकारची डोकेदुखी वाढली. शिवसेनेच्या या विरोधी भुमिकेमुळे खुद्द मुख्यमंत्रीही वैतागले असल्याचं समजतं आहे. संबंधित बातम्या: आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी आता शिवसेना मैदानात ! लोकांनी आमदारांचे कपडे काढायचं बाकी राहिलंय, सेनेचे आमदार मंत्र्यांवर वैतागले ! आमदारांचं निलंबन असंवैधानिक, लोकशाहीचा खून: जयंत पाटील ..म्हणून मोजून 19 आमदारांचं निलंबन : पृथ्वीराज चव्हाण कर्जमाफीवरुन निलंबन चुकीचं, आमदारांच्या निलंबनाला शिवसेनेचा विरोध

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Lift Death: खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
खेळताना अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला अन्.., मुंबईतील 11 वर्षीय झैनच्या मृत्यूप्रकरणी तीन महिन्यानंतर कारवाई
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Sharad Pawar: ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
ज्ञानेश कुमारांबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा, शरद पवारांची भूमिका; उजनीतील AI डेटा सेंटरवरही परखड बोलले
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
IND vs NZ 5th T20 : 3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
Dhule News: तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
Dharashiv Drought: दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Hong Kong Sixes : भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
Embed widget