Thane Bird Flu : ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये बर्ड फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे. वेहलोली गावातील एका पोल्ट्री फार्मवर अचानक तीनशे कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. ते पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. या पोल्ट्री फार्मच्या 1 किमीच्या परिघात असलेल्या सर्व कोंबड्या मारुन टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


इतर पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू पसरु नये यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बर्ड फ्लूनं कोंबड्याचा मृत्यू झाला असला तरी नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. 



एका फार्ममध्ये काही कोंबड्या गेल्या काही दिवसांत बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे जवळपासच्या परिसरातील 23 हजार कोंबड्या मारण्याची तयारी करण्यात आली आहे. या फार्ममधील काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे.


पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील शहापूर तालुक्यातील एका फार्ममध्ये सुमारे 200 कुक्कुट पक्षी होते, त्यापैकी काही पक्षांचा 2, 5 आणि 10 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. 10 फेब्रुवारी रोजी कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्यानंतर 11 आणि 13 फेब्रुवारी रोजी नमुने गोळा करून पुणे आणि भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. 


या संस्थांच्या अहवालात पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून उपाययोजना केली जात असल्याचंही प्रशासनानं सांगितलं. 



इतर महत्वाच्या बातम्या


महाआयटीत 25 हजार कोटींचा घोटाळा, राऊतांचा आरोप, 25 हजार कोटींचा घोटाळा कसा? BJP चा सवाल


Amol Kale : महाआयटी घोटाळा प्रकरण: संजय राऊतांनी आरोप केलेल्या अमोल काळेंनी म्हटलं, देश सोडून...