Mumbai Crime Update : मुंबईत गजबजलेल्या धारावीत दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन जणांनी एका तरुणावर अंदाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात तरुणाला चार गोळ्या लागल्या असून तो गंभीर जखमी झाला आहे. संबंधित तरुणावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धारावी पोलीसांनी घटनेचा तपास करत हल्ला करणाऱ्या दोन्ही मारेकऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. 


हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आमिर असून तो धारावी परिसरातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी शनिवारी सकाळी तो बाथरूमसाठी पिला बंगलो परिसरालगत असणाऱ्या मोकळ्या मैदानात बाथरूम साठी गेला होता. नैसर्गिक विधी उरकल्यानंतर तो परत आपल्या घराच्या दिशेनं येत असताना त्याच दरम्यान दबा धरून बसलेल्या दोन जणांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.


गोळीबार होताच आमिर यानं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी टॅक्सीच्या दिशेनं पळ काढला. पण आरोपींनी पाठलाग करत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात आमिरला चार गोळ्या लागल्या आहेत. घडलेल्या प्रकार जखमी तरुणाच्या एका मित्राने पाहिल्यानंतर त्याने आमिरला तातडीने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. हल्ला झालेला तरुण आणि आरोपी हे गुन्हेगारी प्रवृतीचे तरुण आहेत. ड्रग्स तस्करीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही


धारावी गोळीबार प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एक महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. आरोपींकडून 2 गावठी पिस्तुल, 1 गावटी कट्टा, 15 काडतुसे, 2 चॉपर, 1 कोयता जप्त करण्यात आले आहे. 12 फेब्रुवारीला धारावीमध्ये झालेल्या टोळीयुध्दात गोळीबारात मृत्यू झालेला आमिर खान याला टोळीच्या वर्चस्वासाठी सक्रिय होता. या टोळीने कट रचून आमिरची हत्या केली आहे. या गोळीबारात 8 वेळा गोळी झाडण्यात आली.


आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के कंपनी टोळीतील आरोप कलीमवर मकोका अंतर्गत आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. या दोन्ही टोळ्या धारावीत आपले वर्चस्व वाढवण्यासाठी आपसात भांडण करत होते, त्यामुळे दोन्ही टोळ्यांमध्ये वाद सुरू होते.


हे ही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha