Nandurbar News : हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात अंड्यांची मागणी वाढत असते. त्यामुळे त्यांचे दरही वाढत असतात. मात्र या वर्षी हिवाळ्यात अंड्यांचे दर तब्बल 75 पैशांनी कमी झाल्याने नवापूर मधील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. अंड्यांचे दर कमी झाले असताना कोंबड्यांचे खाद्य महागल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी म्हणायची वेळ अंडी व्यापाऱ्यांवर आली आहे. गुजरात राज्यात दररोज सात ते आठ लाख अंडी विक्रीसाठी जात असतात. डिसेंबर महिन्यात अंड्यांचा प्रति नग दर 5 रुपये इतका होता, मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अंड्यांच्या दरात प्रति नग 75 पैशांनी दर कमी झाल्यानं पोल्ट्री मालकांना मोठा फटका बसला आहे.


 नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील गुजरातच्या सीमावर्ती भागात उतर महाराष्ट्र मधील सर्वात मोठा पोल्ट्री हब आहे. यातून गुजरात राज्यात दररोज सात ते आठ लाख अंडी गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणली जातात. डिसेंबर महिन्यात अंड्यांचा प्रति नग दर 5 रुपये इतका होता. मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अंड्याच्या दरात प्रति नग 75 पैशांनी दर कमी झाल्यानं पोल्ट्री मालकांना मोठा फटका बसला आहे. त्यासोबत पोल्ट्रीमधील पक्षांना लागणाऱ्या खाद्याचा दरही वाढल्यानं मोठा फटका पोल्ट्री मालकांना बसताना दिसत आहे. पोल्ट्री च्या मुख्य खाद्य समाविष्ट असलेल्या सोयाबीन आणि इतर कडधान्याचे दर वाढल्याने तर दुसरीकडे अंड्यांचे दर कमी झाल्याने पोल्ट्री उद्योजक अडचणीत सापडले आहेत.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोरोना प्रादुर्भाव, लॉकडाऊन आणि बर्ड फ्ल्यूमुळे आलेल्या पोल्ट्री धारकांची आर्थिक गणितं चुकली होती. मात्र या वेळी तेजीच्या काळात दर कमी झाल्यानं पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha