एक्स्प्लोर

मुंबईत मानखुर्दमध्ये मंडाळा झोपडपट्टीला भीषण आग

मुंबई : मुंबईच्या मानखुर्दमध्ये मंडाळा झोपडपट्टीला मोठी आग लागली आहे. संध्याकाळी लागलेली ही आग विझवण्यासाठी गेले दोन तास शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत आहेत. ही आग केमिकल साठ्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीमध्ये आज संध्याकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या होत्या, पण आग मोठी असल्यानं आता 17 अग्नीशमन दलाच्या गाड्या आणि 10 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच आता अन्य ठिकाणांहूनही गाड्या मागवण्यात आल्या आहेत. तसंच 2 ईएमएस आणि 5 अँब्युलन्सही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मानखूर्दच्या मुंबई-वाशी रस्त्यावरील ट्रॉम्बे नाक्याजवळ ही आग लागली आहे. आगी लागलेली झोपडपट्टी हायवेच्या अगदी जवळ असून चिचोळ्या आणि अरुंद गल्ल्यांमुळे अग्नीशमन दलाच्या गाड्यांना आगीच्या जवळ जाण्यास अडथळे येत आहेत. रहिवासी परिसर असल्यानं आगीत सिलेंडरचे स्फोटही झाल्याचं दिसत आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलासह मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आगीचं कारण अस्पष्ट असून जीवितहानीची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. लोकांनी आपल्या मौल्यवान वस्तु घराबाहेर आणल्या आहेत. तसंच स्थानिक नागरिकांनी दरवर्षी अशाप्रकारे आग लागते, पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या आगीत दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनाही शताब्दी आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. झोपडपट्टीतील नागरिकांची राहण्याची व्यवस्था तीन शाळांमध्ये करण्यात आली आहे. मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीतील आगीवर 5 तासांनतरही नियंत्रण नाही, एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल

महत्त्वाच्या बातम्या

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget