एक्स्प्लोर
खारघरमध्ये शोरुमला भीषण आग, होरपळून दोघांचा मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील आदित्य प्लॅनेट बिंल्डिंगमधील मारूती सुझुकीच्या शोरूमला भीषण आग लागली. यामध्ये शोरूममधील मारुती सुझूकीच्या नव्या कोऱ्या 8 ते 10 गाड्या जळून खाक झाल्यात. तर शोरुमच्या दोन्हीही वॉचमनचा होरपळून मृत्यू झालाय. कृष्ण कुमार आणि जितेंद्र कुमार अशी मृतांची नावं आहेत. लागलेल्या बिल्डिंगमधील सर्व कुटुंबियांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. खारघर सेक्टर 10 मध्ये सायन-पनवेल हायवेच्या बाजुलाच आदित्य प्लॅनेट बिल्डिंग आहे. या बिल्डिंगच्या बेसमेंटला मारुती सुझूकीचं शोरुम आहे, पहाटे पाचच्या सुमारास शोरुममधून धूर येताना दिसल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अग्नीशमन दलाला बोलावण्यात आलं. शोरुममध्ये असलेल्या आणि बाहेर उभ्या केलेल्या मिळून 8 ते 10 गाड्या या आगीत जळून खाक झाल्याची माहिती आहे.
Before You Go
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha





















